Top Newsराजकारण

उत्तर प्रदेश : भाजपची ८५ जणांची तिसरी यादी जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या निवडणूक प्रचाराला धार देण्यासाठी एक नवे गाणे लाँच केले आहे. सपाच्या “अखिलये आये” या निवडणूक गीतानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज भारतीय जनता पक्षाचे निवडणूक गीत प्रदर्शित केले. भाजपच्या उत्तर प्रदेश ट्विटर हँडलवरून ट्विट करून पक्षाने ही माहिती दिली. तत्पूर्वी भाजपने उत्तर प्रदेशमधील निवडणुकांसाठी उमेदवारांच्या २ याद्या जाहीर केल्या होत्या. आता, ८५ उमेदवारांची तिसरी यादीही जाहीर करण्यात आली आहे.

भाजपने तिसऱ्या यादीत नुकतेच पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले असीम अरुण यांना कन्नौज येथून उमेदवारी दिली आहे. तर, आदितीसिंह यांना रायबरेली मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. तसेच, नुकतेच समाजवादी पक्षातून भाजपात आलेले विधानसभा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले नितीन अग्रवाल यांना भाजपने हरदोई सदर येथून उमेदवारी घोषित केली आहे. भाजपने घोषित केलेल्या ८५ उमेवारांच्या तिसऱ्या यादीत १५ महिलांना संधी देण्यात आली आहे.

भाजपने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवर ओबीसी नेत्यांचा प्रभाव दिसून आला. भाजपच्या दुसऱ्या यादीतील १०७ उमेदवारांमध्ये तब्बल ४४ उमेदवार ओबीसी आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर या मतदार संघातूनच निवडणूक लढतील, हे आज स्पष्ट झाले आहे. या यादीत १९ अनुसूचित जातीचे तर १० महिलांना भाजपने उमेदवारी दिली आहे. एकाही मुस्लिम उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिलेली नाही. दरम्यान, आज भाजपने ८५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.

‘यूपी फिर मांगे भाजपा सरकार’, प्रचार गीताद्वारे सपाला थेट प्रत्युत्तर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज भारतीय जनता पक्षाचे निवडणूक गीत रिलीज केले. भाजपच्या उत्तर प्रदेश ट्विटर हँडलवरून ट्विट करून पक्षाने ही माहिती दिली. या थीम साँगच्या सुरुवातीच्या सीनमध्येच अयोध्येचे भव्य राम मंदिर दाखवण्यात आले असून, मेट्रो ट्रेनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ एकत्र दिसत आहेत. संपूर्ण गाण्यादरम्यान मोठ्या आवाजात ढोलही वाजत आहे.

यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, आज भाजपने आपल्या निवडणूक सामग्रीसोबतच थीम सॉंगदेखील जारी केले. मी या गाण्याला आवाज देण्याऱ्याचे आणि हे गाणे यशस्वीपणे तयार करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या संपूर्ण टीमचे आभार मानतो.

योगी म्हणाले, पाच वर्षांपूर्वी आम्ही आमचा लोककल्याणाचा संकल्प घेऊन वाटचालीला सुरुवात केली होती. त्यावेळी आम्ही राष्ट्रवाद, विकास आणि सुशासन या मार्गाने ध्येय गाठण्याचा संकल्प केला होता. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, आमच्या पक्षाने जे संकल्प केले होते, ते सर्व भाजप सरकारने पूर्ण केले आहेत. उत्तर प्रदेशातील आमच्या सरकारने सुरक्षिततेचे उत्तम वातावरण निर्माण केले आहे. याशिवाय राज्यात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या संधीही उपलब्ध केल्या. पंतप्रधानांच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे आम्ही आमचे ब्रीदवाक्य बनवे आणि त्यानुसार कार्य केले. यावेळी योगींनी भाजप सरकारने उत्तर प्रदेशात केलेल्या कामांची आणि योजनांचीही माहिती दिली.

भाजपला सपा-रालोद युतीचे मोठे आव्हान

शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला समाजवादी पार्टी (सपा) आणि राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) युतीचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने १७ जाट उमेदवार दिले आहेत.

भाजपचे आमदार विक्रम सैनी यांना काही दिवसांपूर्वी मुनव्वरपूर गावात ग्रामस्थांच्या मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले आहे. या निवडणुकीबद्दल मुजफ्फरनगर जिल्ह्याचे प्रमुख जाट नेता सुधीर बालियान म्हणतात की, यावेळी हिंदुत्वाची लाट दुबळी झाली आहे. भाजपचे आमदार आणि सरकार दोघांबद्दल जनतेत नाराजी आहे. जाटांनी याआधी एकतर्फी भाजपला पाठिंबा दिला होता; परंतु आता तशी स्थिती नाही.

मेरठमध्ये असे म्हटले जात आहे की, आता भाजपला पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मुख्य प्रवाहात आणण्याची सगळी जबाबदारी अमित शहा यांच्या प्रचारावर अवलंबून राहील. अमित शहा पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मार्ग किती सोपा करतात हे दिसेल.

भाजप-जेडीयू बोलणी फिसकटली; जेडीयू स्वबळावर लढण्याची शक्यता

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि जनता दलात (संयुक्त) जागा वाटपाची बोलणी शेवटच्या प्रयत्नांतही अपयशी ठरली. उत्तर प्रदेशमध्ये २००७ मध्ये भाजप व जनता दलाने (संयुक्त) निवडणूक एकत्र लढविली होती. ते लक्षात घेऊन भाजपने बिहारमध्ये राष्ट्रीय लाेकशाही आघाडीत (रालोओ) सहभागी असलेल्या आमच्या पक्षाला सामावून घ्यावे, अशी जनता दलाची (संयुक्त) इच्छा आहे. तेव्हा जनता दलाने (संयुक्त) २२ जागा लढवून २ जिंकल्या, तर भाजपने ४५. मायावतींनी सत्ता स्थापन केली होती.

जनता दलाने (संयुक्त) आपले वरिष्ठ नेते आणि केंद्रीय पोलाद मंत्री आरसीपी सिंह यांना भाजपसोबत वाटाघाटी करण्याची जबाबदारी दिली होती. परंतु, वाटाघाटी निष्फळ ठरल्या आणि आम्हाला स्वबळावर लढावे लागू शकेल, असे जनता दलाने (संयुक्त) म्हटले. जनता दलाचे (संयुक्त) सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना ‘आम्ही उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ५० जागा मागत आहोत आणि यावर चर्चा करण्याची इच्छा आहे. भाजपने विचार करून शक्तिशाली आघाडी करावी. परंतु, तसे काही दिसत नाही.” असे म्हटले. आर.सी.पी. सिंह हे भाजप आणि अमित शाह, राजनाथ सिंग, जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान या वरिष्ठ नेत्यांच्या नियमित संपर्कात आहेत. परंतु, या क्षणी तरी काही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. जनता दलाला (संयुक्त) ५० पेक्षा कमी जागांवरही तडजोड करायची होती, असे त्यागी म्हणाले. भाजप उत्तर प्रदेशमधील नितीश कुमार यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद न देण्यामागील एक कारण हे बिहारमध्ये जनता दलाशी (संयुक्त) वाढते मतभेद हे आहे. हे मतभेद विधान परिषद निवडणुकीसाठी जागा वाटप, दारूबद्दलचे धोरण आणि इतर विषयांवर आहेत.

अहंकार निर्माण झाला : भाजप उत्तर प्रदेशमध्ये आघाडी करण्यास का प्रतिसाद देत नाही, असे विचारल्यावर त्यागी म्हणाले, स्वबळावर निवडणूक जिंकण्याएवढा अहंकार भाजपला निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button