
मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अभिनेत्री आणि शिवसेना नेता उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी सकाळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची माहिती दिली. त्यांनी स्वतःला राहत्या घरात क्वारंटाईन करून घेतलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
https://twitter.com/UrmilaMatondkar/status/1454698654787379207
उर्मिला ट्विट करत म्हणाल्या, मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. मी ठिक असून राहत्या घरी क्वारंटाईन आहे. मी स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी प्रत्येकाने कोरोना चाचणी करा… असं आवाहनही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. सध्या त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. याशिवाय उर्मिला यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःची विशेष काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे.




