
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाषणाला सुरूवात करताच विरोधकांवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला कधी वाटू नये, मी तुमच्या घरातलाच आहे. हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला हाणला. काही जण मी पुन्हा येणार म्हणून गेले, ते आता बसले आहेत असाही चिमटा त्यांनी काढला. सत्ता, पद यापलीकडे जनतेचा आशीर्वाद हीच आमची शिवसेनेची ताकद आहे, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात झाल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणा द्यायला सुरूवात केली. शिवसेना पक्ष म्हणून आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, कोणीही जन्माला आलेला नाही. शस्त्रपूजन केल्यावर खऱ्या शस्त्रांवर फुले उधळली हेच प्रेम प्रत्येक जन्मी मिळो हीच माझी प्रार्थना आहे. माझा कुटूंब माझा परिवार हीच शस्त्रे बाळासाहेबांनी दिली आहेत. मी मुख्यमंत्री आहे, हे कधीही वाटू नये. मी तुमच्या घरातला आहे हे वाटो, ही इश्वर चरणी प्रार्थना आहे. जे बोलत होते, मी पुन्हा येईन म्हणणारे ते आता बसले आहेत. जे संस्कार, संस्कृती बाळासाहेबांनी दिले, मा साहेबांनी दिले. पदे काय आहेत, पदे येतील जातील, सरकार असेल पुन्हा येईल आणि जाईलही पुन्हा येईल. मी कुणीतरी आहे, अहमपणा जायला हवा. ज्या क्षणी हवा जाईल, तेव्हा जनता स्विकारेल. म्हणूनच मी जनतेशी नम्रतेने वागतो. कारण आशीर्वाद हीच आमची ताकद आहे, हेच वैभव आहे.
जनतेचा आशीर्वाद हीच ताकद आहे, ती कमावण्याची परंपरा शिवसेनेला मिळालेली आहे. मनात विषयांची गर्दी आहे. गर्दीत विचारांना विचारू शकत नाही की वॅक्सीन घेतली का ? विचारांना मास्क कसा घालणार ? माझ्या भाषणानंतर कधी चिरकायला मिळतय, कधी आम्ही चिरकतोय हेच काही जणांचे काम आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी बोलत नाही मी जनतेसाठी बोतो आहे. पण हल्ली विकृती आली आहे, हे चिरकणे आहे. ठाकरे कुटूंबावर हल्ला करणे काहींचे कामच झाले आहे. पण ठाकरे कुटूंबावर हल्ला करणारा जन्माला आलेला नाही. ठाकरे कुटूंबावर हल्ले करायचे, हे रोजगारी हमीचे काम काही जणांचे झाले आहे. किती पैसा तुम्हाला मिळतो आहे, की तुम्ही चिरकत रहा. पण माझा वाडा चिरेबंदी वेगळ्या प्रकाराने प्रयत्न केला तरीही भेदता येणार नाही. ठाकरे कुटूंबावर हल्ला करणारा अजून जन्माला आलेले नाहीत.
ही काय लायकीची माणसं आहेत, ते आपल्या अंगावर येत आहेत. आव्हान देत आहेत, हिंमत असेल तर अंगावर या. मी कशाला येऊ तुमच्या अंगावर? आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. पण कुणी आलं तर आम्ही सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावर? काय आहे तसं? लायकी तरी आहे का, पात्रता तरी आहे का? हीच शिकवण आम्हाला शिवरायांनी, शिवसेना प्रमुखांनी दिली आहे. पण अंगावर यायची भाषा करत असाल तर स्वत: मध्ये हिंमत आणि धमक असेल तर द्या. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून देऊ नका. मी सुद्धा पक्षप्रमुख म्हणून आज आव्हान द्यायतं असेल तर माझ्या या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून आणि त्यांच्या ताकदवर देईन. मुख्यमंत्री म्हणून देणार नाही. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं, याला नामार्द म्हणतात.
आज दोन मेळावे असतात. एक आपला आणि दुसरा आरएसएसचा. आपले विचार एक आहेत. पण धारा वेगळ्या असू शकतात. विचार एक होत्या, आहेत म्हणूनच भाजपसोबत युती केली होती. ज्यांना अजूनही वाटतं ते मुख्यमंत्री राहिले असते, कदाचित राहिले असते. जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर तुम्हीसुद्धा आज नाहीतर उद्या मुख्यमंत्री राहिले असता. पण नशिबात नव्हतं म्हणून तुम्ही वचन तोडलंत. मी हे पद स्वीकारलं ते एका जबाबदारीने स्वीकारलं. मी केवळ माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं. शिवेसेना प्रमुखांना दिलेलं वचन, तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करुन दाखवेल, खरंतर ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही. पण ते वचन मी पूर्ण करुन दाखवेलंच. ही जबाबदारी मी मोठ्या विचाराने घेतलेली आहे. कदाचित दिलेलं वचन त्यांनी पाळलं असतं शिवसैनिक मुख्यमंत्री केली असती तर मी या राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. हे क्षेत्र माझं नाही, अशी माझ्यावर टीका होते. हो हे माझं क्षेत्र नाही. मी एक पूत्र कर्तव्य निभावण्यासाठी या क्षेत्रात आलो आहे. आणि पाय रोवून ठाम पणाने उभा राहिलो आहे. जी जबाबदारी खांद्यावर आहे ती ठामपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या जबाबदारीने मी उभा राहिलेलो आहे.
हे काही थोडांत नाही की, मैं तो फकीर हुँ, झोली पहनके, ये झोलीबीली असे कर्मदरिद्री आमचे विचार नाहीयत. हे विचार आमचे नाहीत. सकाळी आरएसएसचा मेळावा झाला. हिंदूत्व ही विचारधारा आपल्या दोघांमध्ये समान आहे. हिंदूत्व म्हणजे काय? मला मोहनजींना सांगायचं आहे की, मी जे बोलणार आहे ते कृपा करुन मी तुमच्यावर टीका केली असं मानू नका. पण तुम्ही जे काही सांगत आहात किंवा मी जे काही सांगतोय ते आपलीच माणसं ऐकत नसतील तर या मेळाव्यांची थेरं करायची तरी कशाला? गेल्यावर्षीही मोहनजींनी जे सांगितलं होतं हिंदूत्व म्हणजे काय? मी आणले आहेत त्यांचे वाक्य.
एक मुद्दा मी स्पष्ट करु इच्छितो, आमचं हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकवेळा सांगितलं आहे, पहिल्यांदा आपण माणूस म्हणून जन्माला येतो. जात-पात, धर्म हा नंतर चिकटतो. मग काय करायच? धर्माचा अभिमान असला पाहिजे. धर्म पाळला पाहिजे. पण प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायचा, घराबाहेर पाऊल टाकतो हा माझा देश हा धर्म असलाच पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. हा विचार आमचा आहे. ही शिकवण आम्हाला दिलेली आहे. अशी शिकवण घेऊन आम्ही जेव्हा घराबाहेर पडतो, देश हा धर्म असं म्हणून वाटचाल करत असतो त्यावेळेला आमच्या वाटेत स्वत:च्या धर्माची मस्ती घेऊन कोणी अडथळा आणला तर मग आम्ही कडवट देशाअभिमानी, राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासोबत उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं…
केंद्रीय तपास यंत्रणांकडून आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं याला नामर्द म्हणतात. हे मर्दाचे लक्षण नाही आणि हिंदूत्वाचे नाहीचं नाही. अजिबात नाही. असं विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकेची तोफ टागली आहे. त्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेत्याविरोधात सुरु असलेल्या कारवाईवरून भाजपावर सडकून टीका केली आहे.
उध्दव ठाकरे म्हणाले की, अंगावर आल्यानंतर शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल तर स्वत:मध्ये हिंमत आणि धमक असेल तर आणि तर द्या. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सच्या माध्यमातून देऊ नका. मी सुद्धा पक्षप्रमुख म्हणून आव्हान द्यायचे झाल्यास माझ्या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून आणि त्याच्या ताकदीतून देईन. मुख्यमंत्री म्हणून देणार नाही.
ही काय लायकीची माणसं आणि ही आपल्या अंगावर येतायत? आपल्याला आव्हान देतायतं हिंमत असेल तर अंगावर या आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही. पण कोणी आलं तर आम्ही सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावर.. काय आहे तसं? लायकी तरी आहे का? पात्रता तरी आहे का? पण हीच शिकवण आम्हीला शिवरायांनी आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे हे विसरु नका, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीका केली आहे.
महिलांवर जे अत्यातार होत आहेत. मी दोन-चार वर्षांपूर्वी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात बोललो होतो, माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिंदुत्व नाही. काय तेव्हा उन्माद माजला होता. झुंडबळी म्हणे. त्यावरही भागवत म्हणाले होते की, झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाही. मग हे हिंदूत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचं, कुणाला शिकवायचं? कुणाकडून शिकायचं? जर हिंदुत्वाला धोका नाही हे आजचं जर सत्य असेल तर जेव्हा हिंदुत्वाला धोका होता त्यावेळी एकच मर्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता. अनेक धमक्या आला होत्या. उडवून टाकू, अरे काय उडवून टाकू? पण त्यांनी सांगितलं होतं, ज्या रंगाची गोळी शरीराला स्पर्शून जाईल तो रंग हिंदूस्तानात पिसून टाकल्याशिवाय राहणार नाही. कोणामध्ये धमक होती? ९२-९३ साली जेव्हा पूर्ण मुंबई पेटली होती, इतरही ठिकाणी दंगली झाल्या तेव्हा कोण रस्त्यावर उतरले होते ? कोणी जबाबदारी घेतली होती? बाबरी पाडली तेव्हा आज जे लोकं छाती पुढे करुन पुढे येत आहेत तेव्हा ते त्यांच्या शेपट्या त्या शेपट्या आहेत की नाही एवढ्या आत कापत बिळात लपले होते. थरथरत होते. बोलायची कुणाची हिंमत नव्हती. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, गर्व से कहो हम हिंदू है. तेव्हाही मुंबई वाचवली होती ती पोलिसांच्या मदतीने नाही. लष्कराच्या मदतीने तर नाहीच नाही. पोलीस आणि लष्कर शिवसैनिकांना पिटत होते. मला आठवतंय, कुर्ला-चेंबूर भागात एका झोपडपट्टीत मी गेलो होतो तिकडे. एका झोपडीत शिरलो अंगावर शहारे आले. संपूर्ण झोपडी उद्धवस्त झाली होती. गॅस-सिलेंडर, रक्ताचा सडा, बांगड्या पडलेल्या. मी शिवसैनिकांना विचारलं काय झालं? तेव्हा त्यांनी सांगितलं, इथल्या महिलेल्या घरात कुणी नाही म्हणून काही हैवान तिला घेऊन जात होते. आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही धक्के मारुन भिंतीला पाडलं. त्याच्या विटांनी त्यांना मारलं तेव्हा ते पळून गेले. हा माझा मर्द शिवसैनिक आहे. कोण तरी एक होता. तोच शिवसैनिक केवळ तुमची आज पालकी वाहत नाही म्हणून भ्रष्टाचारी झाला? होय आम्ही पालखीचे भोई आहोत. पण तुमच्या पक्षाच्या पालखीचा भोई होण्यासाठी शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही.
महाराष्ट्रातच ड्रग्ज सापडत आहेत असं नाही…
गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरही ड्रग्ज सापडले त्यावर का नाही बोलत, महाराष्ट्रातच ड्रग्ज सापडत आहेत असं नाही, मग महाराष्ट्राशी नतद्रष्टपणा का? मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर गुजरातला सर्वाधिक निधी, महाराष्ट्र मात्र जनतेच्या पैशाने कोरोनाची लढाई लढतोय.
महराष्ट्रात जर लोकशाहीचा खून, तर यूपीत लोकशाहीचा मळा फुलला आहे का? साकीनाका अत्याचारप्रकरणी राज्यपालांच्या पत्रावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. साकीनाका प्रकरणातील आरोपीला फासावर लटकल्याशिवाय राहणार नाही, असे देखील ते म्हणाले.
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा : मुख्यमंत्री
सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, हिंमत असेल तर पाडून दाखवा, छापा टाकायचा आणि काटा काढायचा, हे जास्त काळ चालू शकत नाही. ‘हर हर महादेव’ दिल्लीच्या तख्ताला दाखवावे लागेल, नवंहिंदूत्वापासून ‘हिंदूत्वाला’ धोका असे ठाकरे म्हणाले.
भाजपात गेलेली ब्रँड अँम्बेसिडर झाली पाहिजेत
एक परवा बोलले आहेत हर्षवर्धन पाटील. की भाजपा. मी म्हणजे ते भाजपामध्ये जाणार… मी तर कधी शक्यच नाही.. अजिबात नाही. माझं जे काही आहे तेच माझं घर आहे. हर्षवर्धन पाटील अनाहूतपणे बोलून गेले की, भाजपत का गेलो?… खरं म्हणजे मला अस वाटत अशी जी काही लोक आहेत जी भाजपात गेली आहेत ती भाजपाची ब्रँड अँम्बेसिडर झाली पाहिजेत. असही टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. हल्ली टीव्हीवर जाहिराती येतात. हल्ली टीव्ही बघायला वेळ नाही मिळत. येतात की नाही तशा जाहीराती आता.. एक कोण तरी गोरा माणूस दाखवतात आणि मग त्याचा तोंडात हिंदी डब करुन टाकतात. पहिले तो मुझे निंद की गोली खाकर भी निंद नही आती थी…दरवाजे पर टकटक होती थी तो रोंगते खडे हो जाते थे….. फिर किसने कहा तूम भाजपा में जाओ…. अब भाजपामे जाने का बाद कुंभकरण जैसी निंद सो सकता हू… दरवाजे पर ठोका तो भी उटता नही हूँ…. असंही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
सावरकर, गांधी उच्चारण्या एवढी आपली लायकी तरी आहे का?
उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर घणाघात केला आहे. तसेच गांधी-सावरकर यांच्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचाही चांगलाच समाचार घेतला आहे. सावरकर-गांधी यांच्यावर केलेल्या विधानामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. यावर सावरकर, गांधी उच्चारण्या इतकी आपली लायकी आहे का? असा खोचक सावल केला आहे. तसेच हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला आहे. दंगलीच्या वेळी शेपटी आत घालून बसलेले आता छाती थोपवत पुढे येत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे की, राजनाथ सिंहांचे विधान वादग्रस्त झाले. सावरकर यांच्याबाबत केलेलं त्यांचे विधान, कशाला जाताय तिकडे सावरकर उच्चारण्या इतकी आपली लायकी तरी आहे का, गांधीजी समजलेत का? आपल्याला सावरकर समजलेत? असे ठाकरी शैलीत मुख्यमंत्र्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरुन विरोधकांना सुनावले आहे.
माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली गेली की, या देशात हिंदूत्वाला धोका आहे का? हिंदूत्वाला धोका आहे का ? केंद्रीय गृहमंत्रालयाने यावर सांगितले की हिंदूत्वाला धोका नाही आहे. याच त दिवसाची याच तर क्षणाची वाट आपण पाहत होतो परंतु हिंदूत्वाला धोकाच नाही आहे म्हटल्यानंतर आता खरं हिंदूत्व हे धोक्यात आहे. पण ते परक्यांपासून नाही आहे तर उपट सूंड नव हिंदू जे उगवलेले आहेत त्यांच्यापासून खरा हिंदूत्वाला धोका आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महिलांवर अत्याचार वाढत आहेत. शिवाजी पार्कमधील काही वर्षांपुर्वी दसरा मेळाव्यात म्हटलं होते माय मरो आणि गाय जगो असे आमचे हिंदूत्व नाही. काय तेव्हा उन्माद माजला होता सगळीकडे झुंड बळी झुंड बळी तेव्हा भागवत म्हणाले होते झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाही आहेत. हिंदूत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचे? कोणाकडून शिकायचे? जर हिंदूत्वाला धोका नाही आहे. हे जर सत्य असेल तर जेव्हा हिंदूत्वाला धोका होता तेव्हा फक्त एकच मर्द ते म्हणजे एकमेव हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदूत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता. काही कसली परवा केली नाही. उडवून टाकू काय उडवून टाकू त्यांनी सांगितले होते. धमक्या येतायत पण ज्या रंगाची गोळी माझ्या शरीरीला स्पर्शून जाईल तो रंग या हिंदूस्थानातून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. कोणामध्ये धमक होती कोणामध्ये हिंमत होती असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
१९९२-९३ साली मुंबई पेटली होती अनेक ठिकाणी दंगली झाल्या होत्या तेव्हा कोण रस्त्यावर उतरले होते. कोणी जबाबदारी घेतली होती. बाबरी पाडल्यानंतरसुद्धा जे लोकं आज जे छाती काढून पुढे आले आहे ते तेव्हा शेपटे त्यांना आहे की नाहीत एवढ्या आतमध्ये गेलेल्या शेपट्या थरथरत बिळात लपले होते ते आता छाती काढून बोलत होते.तेव्हा कोणाची हिंमत नव्हती तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते गर्व से कहो हम हिंदू है असा किस्सा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावर सांगितला आहे.