आरोग्यफोकस

ट्विटरकडून भारतात कोरोना काळात सेवा देणाऱ्या महिलांचा ‘कोविड शीरोज’ नावाने गौरव

मुंबई : : कोविड-१९ ची जागतिक साथ सुरू झाल्यापासून लोकांना जोडून ठेवण्यात आणि विश्वासू स्त्रोतांकडून खरी माहिती पसरवण्यात ट्विटरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतात कोविड-१९ ची दुसरी लाट आल्यानंतर ट्विटरने सेवेसाठी एकमेकांना मदत करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या लोकचळवळीत रिअल टाइम हेल्पलाइनची भूमिका बजावली. यात भारताच्या विविध भागांमधील, विविध पार्श्वभूमी, संस्कृती आणि भाषांमधील अनेक स्त्रिया होत्या. त्यांनी ट्विटरचा वापर विश्वासू माहिती देण्यासाठी, मदत तसेच गरजू लोकांना मानसिक आधार देण्यासाठी केला.

या महिलांचा तसेच त्यांनी आपल्या ऑनलाइन समुदायाच्या माध्यमातून कोविड दिलासा क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ट्विटर इंडिया आणि विमेन्स राइट्स ऑर्गनायझेशन असलेल्या ब्रेकथ्रू (@INBreakthrough) एकत्र आले असून त्यांचा कोविड शीरोज या नावाने गौरव करणार आहेत. ट्विटर इंडिया आणि ब्रेकथ्रूकडून भारताच्या कोविड शीरोज म्हणून विविध पार्श्वभूमीच्या सहा महिलांना पुरस्कार दिले जातील. त्यांची नावेः मिथिला नाइक-सतनाम (@mithilanasa), मॅगी इन्बामुथिया (@MaggieInbamth), अर्पिता चौधरी (@Arpitapv3129), सबिता चंदा (@itsmesabita), फताहीन मिसबा (@MisbahFathaheen) आणि सीमा मिश्रा (@SeemaM4). कोविड शीरोज मोहिमेला ट्विटरचा वापर करून जागतिक साथीदरम्यान दिलासा कार्यात व्यापक योगदान देणाऱ्या भारताच्या कानाकोपऱ्यातील महिलांचा गौरव करण्यासाठी ऑगस्ट २०२१ मध्ये सुरूवात झाली

या वर्षाच्या सुरूवातीला, ट्विटर इंडियाने ब्रेकथ्रूच्या भागीदारीत (@INBreakthrough) जागतिक साथीच्या दरम्यान मदत करण्यासाठी अशक्य कोटीतील प्रयत्न करणाऱ्या महिलांचे नामनिर्देशन करण्यासाठी आवाहन केले (called upon the community). या अशा महिला होत्या, ज्या ट्विटरच्या माध्यमातून कोविडशी संबंधित मदत कार्य करण्यासाठी व्हर्चुअल आघाडीवर उभ्या राहिल्या, त्यांनी लोकांना विविध स्त्रोतांशी जोडले, एसओएस कॉल्स दिले आणि आवश्यक असेल तिथे प्रत्यक्ष स्वरूपातही मदत केली.

https://twitter.com/TwitterIndia/status/1423232350012407813

ट्विटर इंडियाच्या सार्वजनिक धोरण आणि शासन प्रमुख पायल कामत म्हणाल्या की, “कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी भारतीय नागरिक एकत्र आले असताना प्रत्येक क्षेत्रातील महिला सद्भावनेने संवाद साधत आहेत आणि मदतीची गरज असलेल्यांना मदत देत आहेत हे पाहणे खूप आनंददायी होते. आम्ही ओपन इंटरनेटद्वारे स्थापित झालेल्या सार्वजनिक संवादाच्या शक्तीच्या वापराचा गौरव करतो. त्यामुळे कृती होऊ शकते आणि आम्ही या कोविड शीरोजचा गौरव करून त्यात सहभागी होत आहोत. ब्रेकथ्रूच्या भागीदारीत आम्हाला या महिलांचा गौरव करताना खूप अभिमान वाटतो आणि त्यांची कामगिरी इतर अनेकांना बदलांचे माध्यम म्हणून पुढे येण्यासाठी प्रेरित ठरेल, अशी आशा करतो.”

ब्रेकथ्रू ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिनी भट्टाचार्य म्हणाल्या: “या काळात आपण पुन्हा एकदा लोकांना अत्यंत वाईट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी समाज तसेच मदतीची शक्ती किती मोठी असते हे पाहिले आहे. आपल्याला अपेक्षाही नसताना आलेल्या कोविड-१९ दरम्यान दूर गेलेल्या समाजाला मानवतेने जवळ आणले. इंटरनेट आणि विशेषतः ट्विटरच्या शक्तीने त्रासात असलेल्या अनेकांना दिलासा दिला आणि मानवता, करूणा व सामाजिक आधाराची आलेली लाट मनाला उभारी देणारी आणि प्रेरणादायी ठरली. मदत आणि स्त्रोतांसह इतरांशी जोडले जाण्यासाठी लोकांनी मोठे प्रयत्न केलेले आम्हाला दिसले आणि काही ट्विटरवरील महिलांनी आपली पोहोच आणि सहभाग ज्या पद्धतीने वापरला ते त्यांच्या नेतृत्वगुणांचे प्रतीक आहे. या महिलांचा गौरव करणे आणि समाजाला एक अधिक चांगले स्थान बनवत असताना त्यांना प्रोत्साहित करणे हा आमचाच गौरव आहे.”

प्रेक्षकांनी नामनिर्देशित केलेल्या १०० प्रोफाइल्सची तपासणी केल्यानंतर ट्विटर आणि ब्रेकथ्रू इंडियाला (@INBreakthrough) खालील महिलांना कोविड शीरोज (COVID Sheroes) म्हणून घोषित करताना खूप आनंद होत आहे:

अर्पिता चौधरी (@Arpitapv3129), २०, नवी दिल्ली: २० वर्षीय अर्पिता चौधरी या दिल्ली विद्यापीठाच्या पदवी विद्यार्थिनी असून जजबात फाऊंडेशन या दिल्लीस्थित प्रकल्पाच्या संस्थापक आहेत. या प्रकल्पातून वंचित विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी काम केले जाते. भारतात दुसऱ्या लाटेदरम्यान कोविड दिलासा कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी २१ एप्रिल रोजी #LetsFightCovidTogether हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचा भाग म्हणून रूग्णालयातील खाटा, ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय मदत आणि इतर अनेक गोष्टींसह इतर माहितीचा लाइव्ह डेटाबेस (live database) तयार केला. अवघ्या ६० दिवसांत अर्पिता आणि तिला माहिती/ सूचनांची पडताळणी करण्यासाठी मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणी आरूषी राज (कमला नेहरू कॉलेज) आणि शिवानी सिंघल (कालिंदी कॉलेज) यांना हजारपेक्षा जास्त लोकांना मदत करण्यात यश आले. ट्विटरचा वापर करून त्यांनी आपला डेटाबेस गोळा करून अद्ययावत केला. त्यातून लोकांना रिअल टाइम आणि तपासणी केलेली माहिती मिळू शकली. अर्पिताचे कार्य आणि त्यामुळे लोकांच्या आयुष्यावर पडलेला प्रभाव बीबीसी आणि सीजीटीएन अमेरिका यांनी कव्हर केला. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचणे त्यांना शक्य झाले.

फथाहीन मिसबा (@MisbahFathaheen), ३५, मैसुरू: फथाहीन मिसबा आयटीच्या क्षेत्रात काम करतात. परंतु समाजाच्या सेवेसाठी आणि सकारात्मक बदलांसाठी त्यांना मदत करणे आवडते. त्यांच्या या विचारांमुळेच त्या कोविडदरम्यान मदतीसाठी पुढे आल्या. त्यांनी ट्विटरवरील आपला समाज आणि पोहोच यांचा वापर मदतीच्या विनंत्या पुढे पाठवण्यासाठी आणि गरजू लोकांशी संपर्क साधण्यासाठी केला. ब्लड प्लाझा आणण्यापासून ते बेड्स, औषधे आणि इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यापर्यंत फथाहीन यांना लोकांच्या मनात आशा जागवणे शक्य झाले. त्यांनी ट्विटरवर मदत मागणाऱ्या लोकांशी संपर्क तर साधलाच पण त्याचबरोबर सेवेत नसलेल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना स्त्रोत उपलब्ध करून देण्यातही मदत केली.

मॅगी इन्बामुतिया (@MaggieInbamth), ४५, बंगळुरू: मॅगी सामाजिक कल्याण, वैविध्यपूर्णता आणि समावेश या क्षेत्रात मोठे काम करतात. त्या भारतीय कथा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पपेटिका इंडियासोबत काम करतात आणि भारतात प्रादेशिक भाषांमध्ये कथांना प्रोत्साहन देण्यासाठी मंद्रम या नावाची ना-नफा तत्त्वावरील संस्था चालवतात. तसेच लोकांना निसर्गाशी जोडण्यासाठी हॅपीफीट नावाचा आऊटडोअर उपक्रमही त्या चालवतात. कोविड-१९ दरम्यान त्यांनी दक्षिण बंगळुरूमध्ये स्वयंसेवकांच्या टीमचे नेतृत्व केले. त्यांनी दररोज ४० पेक्षा जास्त एसओएस विनंत्या हाताळल्या. ट्विटरच्या माध्यमातून या विनंत्या आणि एसओएस कॉल्स शोधून त्यांच्या टीमला एका दफनभूमीतील कामगाराला बीबीएमपी बेड शोधण्यास मदत करता आली, इतर दोन स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अहमदाबादमधील एका रूग्णाला एम्को मशीन मिळवून देता आली आणि कोविड-१९ ने बाधित एका गर्भवती महिलेला योग्य ती वैद्यकीय मदत मिळवून देणेही शक्य झाले.

मिथिला नाइक-सतनाम (@mithilanasa), २५, मुंबई: मिथिला या मुंबईतील कम्युनिकेशन्स कन्सल्टंट आहेत आणि त्या युनिसेफ इंडिया प्रोजेक्टवर चरखा डेव्हलपमेंट कम्युनिकेशन नेटवर्क, दिल्लीमध्ये काम करतात. त्या खाना चाहिये फाऊंडेशनमध्ये स्वयंसेवक आहेत. (@khaanachahiye). त्यात त्या भागीदारी आणि डिजिटल आऊटरीचचे काम पाहतात. ट्विटरच्या माध्यमातून मिथिला यांना संस्थेचे काम वाढवणे आणि जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले. जागतिक साथीदरम्यान त्यांनी आपल्या डिजिटल ज्ञानाचा तसेच खाना चाहिये कम्युनिटीचा वापर करत लोकांना बेड्स, वैद्यकीय पुरवठा आणि ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी मदत केली.

सबिता चंदा (@itsmesabita), ४०, दिल्ली: सबिता या करियर कोच आणि एचआर सल्लागार आहेत आणि त्या मानवतावादी आहेत. त्या गरजू लोकांना मदत करण्यासाठी आपला वेळ देतात. त्यांनी मायग्रंट वर्कर्स मूव्हमेंट सुरू केली. त्याद्वारे जागतिक साथीमुळे निर्वासित झालेल्या आणि उपाशी असलेल्या सुमारे ८००० पेक्षा जास्त स्थलांतरितांना त्यांनी अन्न आणि रेशनची मदत केली. त्यांनी संकटातील कुटुंबांमधील वंचित मुलांना स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप्सद्वारे ऑनलाइन वर्गात बसण्यासाठी मदतही केली. लोकांना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी त्यांनी केलेली मदत, विशेषतः ब्लड प्लाझ्मासाठी पूर्ण केलेल्या १२०० विनंत्या यांच्यामुळे त्यांना प्लाझ्मा क्वीनचा किताब देण्यात आला. त्यांनी ईशान्य आणि हिमाचल प्रदेशातील राज्य सरकारांसोबत लोकांना वैद्यकीय मदत देण्यासाठीही काम केले. सामाजिक कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्या सबिता लोकांना रेशन मिळवून देण्यासाठी आणि मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी निधी उभारण्यासही मदत करतात.

सीमा मिश्रा (@SeemaM4), ४७, गाझियाबाद: आयसीआर इलम समूहातील निबंधक आणि शैक्षणिक प्रमुख असलेल्या सीमा या विविध स्टार्टअप्सच्या पॅनल सल्लागार आणि मार्गदर्शकही आहेत. एक मानवतावादी म्हणून सीमा यांनी डेव्हलप इंडिया एनजीओची स्थापना केली आणि त्या शिक्षणाचा दर्जा, सबलीकरण आणि पर्यावरण समस्यांसाठी काम करतात. जागतिक साथीदरम्यान सीमा यांनी आपल्या कुटुंब तसेच मित्रांसाठी स्त्रोतांचा शोध घेत असलेल्यांसाठी वैद्यकीय मदत पुरवण्याच्या दृष्टीने स्वयंसेवकाच्या एका समूहासोबत काम करण्यास सुरूवात केली. आपल्या टीमसोबत त्यांनी लोकांना अन्न, ब्लड प्लाझ्मा आणि रूग्णालयातील बेड्सशी जोडले व त्यासाठी त्यांनी आपल्या ट्विटरवरील नेटवर्कचा वापर केला. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील लॉकडाऊनदरम्यान भरकटलेल्या स्थलांतरित लोकांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठीही मदत केली. सध्या त्या लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांच्या मनातील लसीची भीती कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सीमा यांना मागील काही वर्षांमधील त्यांच्या कामासाठी कौतुक आणि गौरव प्राप्त झाला आहे. त्यांना विमेनोव्हेटरसाठी गाझियाबादचे इन्फ्लुएन्सर म्हणून गौरवान्वित करण्यात आले असून हा महिलांसाठीचा पहिला व्हर्चुअल ग्लोबल इनक्युबेटर आहे. त्यांच्यावर ११ प्रेरणादायी भारतीय महिलांनी केलेल्या सामाजिक बदलांबाबत चेंजमेकर्स या पुस्तकातही लेखन प्रकाशित झाले आहे.

या वर्षाच्या सुरूवातीला आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी ट्विटरने सुरू केलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले होते की, भारतातील ट्विटरवरील २०.८ टक्के महिला चालू घडामोडींवरील संवादात सहभागी होतात आणि ८.७ टक्के महिला सामाजिक बदलांबाबत बोलण्यास उत्सुक असतात. या निष्कर्षांचा पुरावा म्हणून समोर आलेल्या या कोविड शीरोज हजारो लोकांसाठीच्या कठीण काळात आशेचा किरण ठरल्या आणि त्यांनी आपल्या उद्योजकतेच्या कौशल्यांद्वारे बदलाला प्रोत्साहन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button