ट्विटर इंडियाचे वरिष्ठ संचालक मनीष माहेश्वरी यांची अमेरिकेत बदली

नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने भारतातील सोशल मीडियावरून सुरू असलेल्या गोंधळादरम्यान मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरी यांची आता अमेरिकेत बदली झाली असून, तेथे त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे.
अमेरिकेत मनीष माहेश्वरी हे रेव्हेन्यू स्ट्रेटडी अँड ऑपरेशन्सचे सिनिअर डायरेक्टरच्या भूमिकेसह तेथील नवीन मार्केटवर लक्ष केंद्रीत करतील. तसेच, कंपनीच्या ग्लोबल स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्सचे ऑपरेशन्सचे सिनिअर डायरेक्टर डीएट्रा मारा यांना ते रिपोर्ट करतील.
मनीकंट्रोलने या निर्णयाच्या घोषणेच्या ईमेलच्या कॉपीचा आढावा घेतला आहे आणि सर्वात आधी ही बातमी दिली. आमचे भारताचे डायरेक्टर आणि भारतील हेड म्हणून २ वर्षांहून अधिक काळ टीमला सपोर्ट केल्यानंतर मनीष सॅन फ्रान्सिस्कोमधील सिनिअर डायरेक्टर, रेव्हेन्यू स्ट्रेटडी अँड ऑपरेशन्सवर एक नवीन भूमिका बजावतील, ज्यात नवीन मार्केटवर लक्ष केंद्रीत केले आहे, असे ईमेलमध्ये म्हटले आहे.
ईमेलनुसार, ट्विटरच्या सध्याच्या सेल्स हेड कनिका मित्तल आणि ट्विटरच्या सध्याच्या बिझनेस हेड नेहा शर्मा कत्याल मिळून लीड करतील आणि ट्विटर जपानचे वाइस प्रेसिडेंट यू सासामोटो यांना रिपोर्ट करतील. ट्विटरचे सिनिअर एक्झिक्युटिव्ह यू सासामोटो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन ते दोन वर्षांहून अधिक काळात आमच्या भारतीय व्यवसायाच्या नेतृत्वाबद्दल मनीष महेश्वरी यांचे आभार. अमेरिकेतील वर्ल्डवाइड न्यू मार्केटसाठी रेव्हेन्यू स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्स चार्जच्या नवीन भूमिकेबद्दल तुमचे अभिनंदन. ट्विटरसाठी तुम्ही या महत्त्वाच्या पोस्टचे नेतृत्व करता हे पाहून मी उत्सुक आहे.