तंत्रज्ञान

टीव्हीएस कंपनीची TVS Apache RTR 160 4V सर्वाधिक शक्तिशाली मोटारसायकल

होसूर :  दुचाकी व तीन चाकी गाड्यांची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने आज 2021 TVS Apache RTR 160 4V मोटारसायकल बाजारात दाखल केली.  ग्राहकांच्या वाढत्या, नव्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक जास्त शक्ती आणि टॉर्क मिळवून देत या मोटारसायकलचे रेसिंग हे मूळ गुणवैशिष्ट्य याही वेळी कायम राखले गेले आहे.  त्यामुळे ही मोटारसायकल सर्वोत्तम कामगिरी बजावते.  १७.६३ पीएस ची शक्ती असल्यामुळे ही तिच्या श्रेणीतील ‘सर्वाधिक शक्तिशाली’ मोटारसायकल बनली आहे.

टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रीमियम मोटारसायकल्सचे (मार्केटिंग) हेड श्री. मेघश्याम दिघोले यांनी सांगितले, “रेसिंग गुणवैशिष्ट्यांची गेली ३८ वर्षांची परंपरा पाठीशी असलेली नवी 2021 TVS Apache RTR 160 4V आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी बजावते.  पॉवर आणि गाडीचे वजन यांचा सुधारित रेशो, अधिक जास्त टॉर्क यामुळे आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बरोबरीनेच रायडिंगचा अधिक चांगला अनुभव देखील मिळेल.  ग्राहकांना मिळणाऱ्या समाधानामध्ये अधिकाधिक उच्च मापदंड निर्माण करण्यासाठी टीव्हीएस अपाचे कटिबद्ध आहे.  आम्हाला पक्की खात्री आहे या सुधारणांमुळे आमच्या TVS Apache RTR 160 4V मोटारसायकलच्या यशोगाथेमध्ये पुढचा अध्याय सुरु होईल.”

2021 TVS Apache RTR 160 4V मोटारसायकलमध्ये १५९.७ सीसीचे आधुनिक इंजिन, सिंगल सिलिंडर, ४ व्हॉल्व, ऑइल-कूल्ड इंजिन असून ते ९२५० आरपीएमला १७.६३ पीएस शक्ती आणि ७२५० आरपीएमला १४.७३ एनएम टॉर्क देते.  या इंजिनसोबत ५-स्पीड सुपर-स्लिक गियरबॉक्क्स असून त्यामुळे रायडिंगचा अतिशय अचूक आणि शक्तिशाली अनुभव मिळतो.  या मोटारसायकलमध्ये पूर्णपणे नवी ड्युअल टोन सीट, सोबत कार्बन फायबर पॅटर्न आहे.  क्लॉ स्टाइल्ड पोझिशन लॅम्प्ससोबत एलईडी हेडलॅम्प या गाडीची एकंदरीत प्रीमियम वेधकता वाढवतात.  याशिवाय या मोटारसायकलचे वजन २ किलोंनी कमी झाले आहे.  डिस्क व्हेरियंटचे वजन १४७ किलो तर ड्रम व्हेरियंटचे वजन १४५ किलो आहे.

नव्या 2021 TVS Apache RTR 160 4V मोटारसायकलमध्ये रंगांचे तीन पर्याय आहेत: रेसिंग रेड, नाईट ब्लॅक आणि मेटॅलिक ब्ल्यू यामधून ग्राहक आपल्या आवडीचा रंग निवडू शकतात.  सध्याच्या किमतीला ही गाडी दोन प्रकारात उपलब्ध आहे – डिस्कची किंमत १,१०,३२० रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आणि ड्रमची किंमत १,०७,२७० रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे.

Watch the official TVC here – https://youtu.be/yyX3ND_iv1s

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button