
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती अटक केली. या कारवाईने पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच दरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून भाजपावर जोरदार निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे.
भाजपचे लोक काहीही करू शकतात. ते कोणालाही अपमानित करू शकतात. त्याला काही कारण हवेच असे नाही. भाजपाला कशाचीतरी भीती वाटत आहे. ते घाबरले आहेत आणि त्यातून त्यांनी तपास यंत्रणांना कामाला लावलं आहे. अडचणीचे ठरतील अशा व्यक्तींना टार्गेट करायचे हे त्यांचे जुनेच कारनामे आहेत. अशा व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्याला जेलमध्ये टाकले जाते. त्याची मानहानी केली जाते. सूडबुद्धीने हे उद्योग चालतात. असा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडला आहे. मलिक यांच्याबाबतीतही तेच झाले, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
भाजपने विधानसभेत दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली गेली. संशयास्पद वस्तूही सापडली मात्र नंतर तपासातून तो लाकडाचा भुसा असल्याचे स्पष्ट झाले असंही अखिलेश यांनी म्हटलं आहे.