राजकारण

राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : दरवर्षी प्रशासकीय कामाचा भाग म्हणून काही नियमित अधिकाऱ्यांची बदली केली जाते. या बदल्यांच्या प्रक्रियेला राज्य सरकारने निश्चित कालमर्यादा दिली आहे. त्यामुळे या कालावधीत वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. काही दिवसांपूर्वी राज्यातील १४ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ५ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. या प्रक्रियेनुसार कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे.

डॉ. महेंद्र कल्याणकर यांची रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

एम. बी. वरभुवन (मंत्रालय जीएडी कनिष्ठ सचिव) यांची बदली करुन त्यांना अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्त केले आहे.

संजय मीणा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांनी ठाण्यातील अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.

निधी चौधरी (रायगड जिल्हाधिकारी) यांना मुंबईच्या आयटी, डायरेक्टर म्हणून नियुक्त केले आहे.

दीपक सिंगला (जिल्हाधिकारी, गडचिरोली) यांना सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर म्हणून नियुक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button