…ही तर फक्त सुरुवात; अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर कंगनाचं खोचक ट्विट

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांबाबत Adv. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर तत्काळ अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच काही वेळापूर्वी अनिल देशमुख यांनी स्वतः ट्वीट करून राजीनाम्याचे पत्राचा फोटो शेअर केला आहे. आता याच पार्श्वभूमीवर नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने ट्वीट केलं आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, असं खोचक ट्विट कंगना रनौतने देशमुखांच्या राजीनाम्यावर केलं आहे.
काय म्हणाली कंगना रनौत?
‘जो साधुंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करेल त्यांचा विनाश होणे निश्चित आहे #AnilDesmukh. ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे बघा काय होतं #UddhavThackeray,’ असं लिहून कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ कंगनाचा स्वतः असून ती म्हणतेय की, ‘आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा. ये वक्त का पहिया है, याद रखना.. हमेशा एक जैसा नहीं रहता.’