मुंबई : अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी काही निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय किंवा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असे वर्तन करू नये, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्यातील ऑक्सिजन साठ्यामध्ये वाढ झाली नाही. तसेच जेव्हा राज्यात ७०० मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजनची गरज भासेल तेव्हा आपाल्याला राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा दिला.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र सध्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार योजना आखत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे ठाकरे सरकारकडून बाल कोविड सेंटरची उभारणी केली जात आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सर्व सुविधांनी युक्त बाल कोविड सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच इतर देशांमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपल्याकडे लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, तरी देखील सर्व गोष्टींची तयार ठेवत आहोत. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांना कोरोना झाला तर त्यांना हॉस्पिटलच्या भयावह वातावरण न ठेवता चांगल्या वातावरण ठेवण्यासाठी बाल कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.