राजकारण

खासदार असताना माझ्यासह बड्या नेत्यांचे फोन टॅप; नाना पटोलेंचा भाजपवर आरोप

पीएमकेअर फंडातील व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा; चौकशीची मागणी

मुंबई : राज्यात मागील काही महिन्यांपासून फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण भाजप खासदार असताना २०१६-१७ साली फोन टॅप करण्यात आला असल्याचा दावा केला आहे. माझ्यासोबत भाजपच्या बड्या नेत्यांचा, शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा फोन टॅप करण्यात आला होता असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. फोन टॅप करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. या प्रकरणी नंबर माझा व अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या फोन टॅपिंगशी संबंधित सर्वांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात पटोले म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेतील काही महत्वाचे नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचेही फोन टॅपिंग केले जात होते. माझा संबंध अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा प्रयत्न करुन हा निंदनीय व अश्लाष्य प्रकार करण्यात आला आहे. फोन टॅपिंग करताना नावे व पत्ते खोटी तसेच बनावट दाखवून फोन टॅप करण्यात आले. हे फोन टॅपिंग कोणी केले आणि त्यांना परवानगी कोणी दिली ? फोन टॅपिंग करण्याचा उद्देश काय होता ? फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे तसेच हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे खपवून घेणार नाही. जे कोणी या फोन टॅपिंगशी संबंधीत होते त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, असेही पटोले म्हणाले.

पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा; चौकशीची मागणी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. यानंतर केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून राज्याला व्हेंटिलेटर वितरित केले होते. परंतु या पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा असून निकृष्ट दर्जाचे आहेत. याबाबत राज्य सरकारने राज्य स्तरीय चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. नाशिकमध्येही पीएम केअर फंडातून ६० व्हेंटिलेटर देण्यात आले होते ते कनेक्टरशिवाय पाठवण्यात आले होते संकटकाळात केंद्र सरकारकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप राज्यातील नेत्यांनी केला होता.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्याल औरंगाबाद यांनी नेमलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीला पीएम केअर फंड अंतर्गत सदर संस्थेला पुरवलेले सर्व व्हेंटिलेटर पुर्णतः निरुपयोगी आढळले. त्यांच्या अहवालानुसार कंपनी तंत्रज्ञदेखील हे दुरुस्त करु शकले नाहीत. हा मोठा घोटाळा आहे. केंद्रामार्फत पुरविल्या महाराष्ट्राला पुरवलेल्या सर्व व्हेंटिलेटरची राज्यस्तरीय चौकशी करण्याची आम्ही मागणी करतो. पीएम केअर फंडच्याच्या माध्यमातून वाया गेलेला वेळ व जनतेचा पैसा अक्षम्य असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button