अर्थ-उद्योग

युरोप व भारतातील कोव्हिड-१९ रुग्ण वाढीचा स्पॉट गोल्डच्या दरावर परिणाम

मुंबई : युरोप व भारतात कोव्हिड-१९ चे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने स्पॉट गोल्डचे दर ०.४% नी वाढले व ते १७३४.२ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नात सहजता आल्याने पिवळ्या धातूच्या मागणीत आणखी वाढ झाली. भारत आणि युरोपात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने नव्या लॉकडाऊनची शक्यता आहे. यामुळे बाजारातील जोखिमीच्या व्यवहारांवर परिणाम झाला आणि सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याला आधार मिळाला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

अमेरिकी चलन डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने सोन्याच्या किंमतीतील नफ्यावर मर्यादा आल्या. अमेरिकेच्या ट्रेझरीचे उत्पन्न कमी झाल्याने तसेच ग्रीनबॅक कायम राहिल्याने अमेरिकी फेडरल रिझर्व्ह चेअर जेरॉम पॉवेल यांनी महागाईला कमी करण्याचे आश्वासन दिले. तथापि, कोव्हिड-१९च्या रुग्णसंख्येत वाढ तसेच अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने पिवळ्या धातूच्या किंमती आणखी कमी होऊ शकतात. आजच्या व्यापारी सत्रात सोन्याचे दर घसरण्याची शक्यता आहे.

कच्चे तेल: डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ६% नी वाढले व ते ६१.२ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. तेलातील काही नफा या आठवड्यात भरून निघाला, कारण १३ दशलक्ष बॅरल्स अडकून पडले आहेत. तथापि, युरोपमध्ये नव्या निर्बंधांच्या चिंतेमुळे हा नफा मर्यादित राहिला. अमेरिकी साठ्यातील वाढ आणि धीमे लसीकरण यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीवर परिणाम झाला.

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे युरोपात लॉकडाऊनची चिंता आहे. तसेच ज्यादा पुरवठ्याच्या चिंतेने जागतिक तेल बाजारातील कच्च्या तेलाच्या नफ्यावर मर्यादा आल्या. ऑक्सफोर्ड/अॅस्ट्राझेनेका लसीच्या दुष्परिणामांमुळ युरोपातील प्रमुख देशांनी लसीकरण मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण रद्द झाल्याने तेलाच्या मागणीतील सुधारणेवर आणखी नकारात्मक परिणाम झाला. मजबूत अमेरिकी डॉलरसह क्रूडची कमकुवत मागणी तसेच युरोपातील वाढत्या कोव्हिड-१९ रुग्णांमुळे तेलाचे दर आणखी घसरू शकतात. आजच्या व्यापारी सत्रात एमसीएक्सवर तेलाचे दर घसरण्याची शक्यता आहे.

बेस मेटल्स: एलएमईवरील बेस मेटलने संमिश्र संकेत दिले. या समूहात अॅल्युमिनिअमने सर्वाधिक नफा कमावला. कोव्हिड-१९च्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने नव्याने निर्बंधांच्या चिंतेने तसेच अमेरिकी डॉलरचे मूल्य वाढल्याने औद्योगिक धातूंचे दर घसरले. युरोपमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी फेडरलने महागाई नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन दिले, यामुळे डॉलरच्या मूल्यात वाढ झाली. यामुळे औद्योगिक धातूच्या मागणीत काहीशी वाढ झाली.

यासोबतच, चीनमधील कठोर पर्यावरणाच्या नियमांमुळे मागणीत आणखी घट होण्याची चिंता आहे. त्यामुळे बेस मेटलच्या मागणीत आणखी घट होऊ शकते. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ऊर्जा वापरातील मर्यादांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी चिनी शहरांवर दबाव आणला जात आहे. एलएमई नियंत्रित वेअरहाऊसमधील निकेल साठे जवळपास २६१६६० टनांपर्यंत असून मागील ३० महिन्यांतील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button