Uncategorized

ईडीचा पाठलाग सुरूच; अनिल देशमुखांच्या हॉटेलवर छापेमारी

नागपूर : १०० कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी बेपत्ता आहे. पण आज पुन्हा एकदा ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील संस्थांवर छापा टाकला आहे.

ईडीच्या टीमने वर्धा रोड येथील अनिल देशमुख यांच्या ट्रॉयटोल हॉटेलवर छाप टाकला आहे. शुक्रवारी सुद्धा ईडीने अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेच्या एनआयटी कॉलेजवर छापा टाकला होती. तब्बल ३ तास ईडीची ही छापेमारी चालली. अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांनी ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी साई शिक्षण संस्थेच्या वापर केला असा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्लीच्या एका व्यापाऱ्याने डोनेशन म्हणून या शिक्षण संस्थेत पैसे टाकले होते. त्यासाठी बोगस शेल कंपन्यांचा वापर करण्यात आला. त्याचाच तपास करण्यासाठी ईडीचे एक पथक फेटरी जवळील एनआयटी कॉलेजमध्ये पोहोचले होते.

ईडीने आपल्यासोबत सीआरपीएफचे एक पथकसोबत आणले होते. नागपूरमधील अनिल देशमुख यांच्या संस्थेवर छापा पडण्याची ही चौथी वेळ आहे. या आधी सुद्धा नागपूरमधील त्यांच्या जवळच्या लोकांवर छापे पडले होते.

दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋृषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावला आहे. या समन्सनुसार अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखांना ई़डीने चौकशीसाठी बोलावले होते. पण, देशमुख कुटुंबीय चौकशीला हजर राहिले नाही. ३० जुलैला ईडीनं अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश आणि पत्नीला देखील समन्स बजावलं. असून चौकशीला हजर न राहिल्यास ईडी कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, देशमुख कुटुंबीय अजूनही नॉट रिचेबल आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीय चौकशीला आलेच नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button