अर्थ-उद्योग

एमजी झेडएस ईव्ही २०२२ चा फर्स्ट लुक आला समोर

मुंबई : एमजी मोटरने २०२० मध्ये भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक कार एमजी झेडएस ईव्ही लाँच केली होती. या ईव्हीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. एमजी मोटर लवकरच नवीन झेडएस ईव्ही २०२२ लॉन्च करणार असून नुकताच या ईव्हीचा फर्स्ट लुक समोर आला आहे.

एमजी झेडएस ईव्ही २०२२ मध्ये अद्ययावत फ्रण्ट फेशिया, एलईडी हेडलॅम्प्स, डीआरएल, नवीन अलॉई व्हील डिझाइन, नवीन बम्पर आणि नवीन टेललाइट डिझाइन असण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त नवीन एमजी झेडएस ईव्हीमध्ये अधिकाधिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेणारी अधिक वैशिष्ट्ये असण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button