अॅबॉट आणि रिअल मद्रिद संघ देणार मुलांच्या आरोग्य व पोषणाला आधार

मुंबई : अॅबॉटने रिअल मद्रिद फुटबॉल क्लबचा आरोग्य विज्ञान व पोषण या विषयांतील भागीदार बनण्यासाठी तसेच खेळामध्ये अंतर्भूत मूल्यांचा जगभरातील मुलांमध्ये प्रसार करण्यासाठी केलेल्या तीन वर्षांच्या कराराची आज घोषणा केली. या करारामध्ये ८० देशांतील असुरक्षित गटातील मुलांना आधार देण्यासाठी हाती घेण्यात येणा-या शैक्षणिक, क्रीडा आणि समाजकल्याण उपक्रमांचा समावेश असणार आहे, तसेच या भागीदारीअंतर्गत फर्स्ट मेन्स व फर्स्ट विमेन्स आणि अकॅडमी संघांना पाठबळ पुरवले जाणार आहे व नवीन उत्पादनांचे संशोधन व विकास केला जाणार आहे.
रिअल मद्रिद हा जगातील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध स्पोर्टस् क्लब आहे व जगभरातील ६० कोटींहून अधिक चाहत्यांचे पाठबळ त्याला लाभले आहे. खेळाच्या माध्यमातून, संघभावना, परस्परादर, सहयोग आणि शारीरिक सुदृढता यांसारख्या मूल्यांचे शिक्षण देण्याच्या माध्यमातून जगभरातील असुरक्षित गटांतील मुलांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मता आणण्यासाठी या क्लबने १९९७ मध्ये रिअल मद्रिद फाउंडेशनची स्थापना केली
भारतीय मुलांच्या बाबतीत कुपोषण ही समस्या हा मोठाच काळजीचा विषय आहे. या समस्येचे आरोग्यावर होणारे दुष्परिणामांचे सावट त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर पडत असल्याने ही चिंता अधिकच गहिरी बनते.” अॅबॉट बिझनेस, इंडियाच्या जनरल मॅनेजर स्वाती दलाल म्हणाल्या, “आपण चांगल्या, अधिक आरोग्यपूर्ण भविष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना या प्रवासात जगभरातील लहान मुलांच्या पोषणाची जोपासना करणे हे अॅबॉट आणि रिअल मद्रिद फाउंडेशन या दोघांचेही सामायिक लक्ष्य आहे. फुटबॉल अवघ्या जगाचा लाडका खेळ आहे, जो निरोगी जीवनशैली जपण्यासाठीच्या सवयींना प्रोत्साहन देतो आणि या सहयोगाद्वारे आम्हाला आपल्या कामाची व्याप्ती वाढविता येईल तसेच आमच्या एकत्रित प्रयत्नांच्या आणि संसाधनाच्या माध्यमातून लहान मुलांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करता येईल अशी आम्हाला आशा आहे. “