Top Newsराजकारण

‘मातोश्री’ बाहेर पडून मुख्यमंत्र्यांनी कोकणसाठी ३ तास दिल्याबद्दल आभार; दरेकर यांचा टोला

मुंबई : कोकणात २ ते ३ तासासाठी येऊन कोकणवासियांच्या व्यथा काय समजणार आहेत. इथे येऊन विमानतळावर बैठका घेण्यापेक्षा मुंबईतच सगळ्या अधिकाऱ्यांना का नाही बोलावले अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तीन तासाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मागील २ दिवसांपासून पाहणी दौरा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फक्त केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’ होता अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर मागील २ दिवसांपासून रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचा पाहणी दौरा करत आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून ३ जिल्ह्यांना ३ तास दिल्याबद्दल आभार असा टोलाही दरेकरांनी लगावला आहे.

कोकणच्या जनतेने सातत्याने शिवसेनेला पाठबळ दिलं. त्या अनुषंगाने कोकणचा भरीव विकास होईल, अशी कोकणवासीयांची अपेक्षा होती. मात्र कोकणच्या जनतेच्या अपेक्षा मातीत घालण्याचं काम ह्या महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. असे वक्तव्य दरेकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांचा खऱ्या अर्थाने ‘वादळी’ दौरा!

वादळ येण्यापूर्वी जसे ३ दिवस प्रशासन कामाला लागते तसेच आताही झाले. या ‘वादळा’ने फक्त ३ तासात धूळधाण केली. या ‘वादळा’मुळे कोकणात इतकी पानं पडली की आता लोकांच्या तोंडाला पुसायला पण पानं शिल्लक राहिली नाहीत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून घराबाहेर पडून, कोकणातील ३ जिल्ह्यांना मिळून तब्बल ३ तास दिल्याबद्दल मुख्यमंत्र्याचे आभार असा टोला दरेकर यांनी ट्विट करत लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button