राजकारण

तो आवाज माझा नाही, ऑडिओ क्लिपची चौकशी करा; प्रसाद कर्वेंची मागणी

अनिल परब, मिलिंद नार्वेकरांचे नाव तक्रारीत नव्हते

दापोली : शिवसेना नेते रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणातील प्रसाद कर्वे यांच्याशी एका वृत्तवाहिनीने संपर्क साधून त्यांची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मी कुठली ही माहिती किरीट सोमय्यांना पुरवली नाही, किरीट सोमय्या आणि माझा संवाद नाही, अशी भूमिका प्रसाद कर्वे यांनी मांडली आहे. किरीट सोमय्यां यांनीच महावितण आणि प्रांत कार्यालयात माहिती अधिकारात अर्ज दाखल केला होता, असं कर्वे म्हणाले. तर ऑडिओ क्लिप बेकायदेशीरपणे बाहेर काढल्यात, असं मत देखील प्रसाद कर्वे यांनी मांडलं आहे.

वैभव खेडेकर यांनी वैफल्यग्रस्ततेमुळे आरोप केले आहेत. मी रामदास कदम यांना ३० वर्ष ओळखतोय. मुरुड, लाडघर इथल्या सीआरझेडमधील बीनशेती परवागी दिल्या त्या विरोधात माझी तक्रार होती. तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांनी दिलेल्या परवागी संदर्भात आरटीआय मध्ये अर्ज दाखल केला होता. ३३ जणांविरोधात तक्रारीचा अर्ज केला होता त्यामध्ये मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या विरोधात तक्रार केली नव्हती, असं प्रसाद कर्वे म्हणाले आहेत. प्रसाद कर्वे यांनी थेट तक्रार केलेला अर्ज या वृत्तवाहिनीसमोर समोर सादर केला आहे.

रामदास कदम यांनी कुणाच्या विरोधात तक्रार करू नको असं सांगितल्याची माहिती प्रसाद कर्वे यांनी दिली. सीआरझेडमध्ये अर्ज केल्यास लोकांना त्रास होईल. त्यामुळे मी कुणाला माहिती दिली नाही, त्यानंतर तक्रार देखील केली नाही, अशी माहिती प्रसाद कर्वे यांनी दिली.

माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग नाही, मी कुणाचे रेकॉर्डिंग ठेवत नाही, ऑडिओ क्लिप संदर्भातील आवाज माझा नाही, असं कर्वे म्हणाले. ऑडिओ क्लिपची तपासणी करावी, मी चौकशीला सामोरं जायला तयार आहे, असं कर्वे म्हणाले आहेत. किरिट सोमय्या यांचा माझ्याकडे नंबर नाही, मी कशी किरिट सोमय्या यांच्यांशी बोललेलो नाही. ज्यांनी क्लिप काढल्या त्यांनी चौकशी करावी, आवाजाची चौकशी करावी. माहितीच्या अधिकारात मी पुरावे गोळा केलेत. महावितरण आणि प्रांत अधिकाऱ्यांकडे किरीट सोमय्या यांनी अर्ज केलाय.

मिलिंद नार्वेकर यांचे आईचे आजोळ दापोलीत, त्यांचे आमचे संबध चांगले आहेत.ऑडिओ क्लिप पूर्ण खोट्या आहेत. सोमय्या यांनी ही माहिती कुठून घेतली हे मी शोधून काढतोय, असं कर्वे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button