राजकारण

मनसुख हिरेन हत्या कटात ११ जणांचा सहभाग; सचिन वाझे सूत्रधार

'एटीएस'चा तपास निर्णायक टप्प्यावर

ठाणे : मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात (Mansukh Hiren death case) 11 जण सहभागी होते, अशी धक्कादायक माहिती ठाणे दहशतवाद विरोधी पथकाला (Thane ATS) मिळाली आहे. या सर्व कटाचे सूत्रधार अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) असल्याचे ठोस पुरावेही एटीएसला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एपीआय सचिन वाझे हे टेक्निकल एक्सपर्ट मानले जातात. परंतु या प्रकरणात, महाराष्ट्र एटीएसने देखील टेक्नोलॉजीची मदत घेतली आणि आरोपींनी अटक केली. सूत्रांनी सांगितले की, 4 मार्च रोजी रात्री 8 ते साडेआठ वाजेपर्यंत मनसुखला अखेरचा व्हॉट्सअॅप कॉल आला, जो सापडणे सोपे नव्हते. यामुळे एटीएसने महाराष्ट्रातील सर्व बड्या टेक्नोलॉजी एक्सपर्ट्ची मदत घेतली.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणार्‍या महाराष्ट्र एटीएसने दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये विनायक शिंदे नावाच्या निलंबित पोलिस हवालदाराला आणि नरेश गोरे नावाच्या क्रिकेट बुकीचा समावेश आहे. टेक्नोलॉजीची मदत घेऊन एटीएसने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या ठिकाणी प्रत्यक्ष चार ते पाच जण उपस्थित होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकला, या ठिकाणी अटक आरोपी विनायक शिंदे स्वतः उपस्थित होता, असंही तपासात समोर आलं आहे.
हत्येच्या दिवशी म्हणजेच चार मार्च रोजी रात्री मनसुख हिरेन अर्धा तास कुणाशी तरी व्हॉट्सअॅप कॉलवर बोलत होते. हे नंबर अनोळखी होते, हेच सिमकार्ड बुकी नरेश गोरे याने उपलब्ध करुन दिले असण्याची शक्यता आहे. या सर्व कटाचे सूत्रधार सचिन वाझे असल्याचे ठोस पुरावे एटीएसला मिळाले आहेत.

एटीएसचे DIG शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा केला आहे. “अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण ATS पोलीस फोर्समधील सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो. ज्यांनी गेल्या काही दिवसांत रात्रंदिवस एक केला आहे. त्यामुळे या केसमध्ये न्यायपूर्ण परिणाम समोर आला आहे. ही केस माझ्या संपूर्ण पोलीस करिअरमधील सर्वात जटील केसमधील एक आहे” असं शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा (Mansukh Hiren death case) तपास एनआयएकडे (NIA) सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) हा मोठा धक्का मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button