Top News

आरक्षण द्यायचे नसल्यामुळेच ठाकरे सरकारचे वेळकाढूपणा; फडणवीसांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : ठाकरे सरकारला मराठा आरक्षणच द्यायचं नाहीये. त्यामुळे त्यांनी ५० टक्के मर्यादेचं नवं कारण शोधलं आहे. नवनवीन मुद्दे काढून सरकार वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत केला. इंद्रा सहानी केसमध्ये अतिशय स्पष्टपणे यावर भाष्य केलं आहे. सध्या मुद्दा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा नाही, तर मागास घोषित करण्याचा आहे. एखाद्या समाजाला मागास घोषित केल्यानंतर किती टक्के आरक्षण द्यायचं हा नंतरचा भाग आहे. अजून मागासच घोषित केलं नाही, मग आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल करतानाच आतापर्यंत जातींना मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवलं जात होत. आता राज्यांना अधिकार मिळतोय. त्यामुळे सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्ला चढवला. राज्याचे अधिकार राज्याकडेच राहतील अशी आमची मागणी होती याबद्दल आज अमित शहा यांची भेट घेतली. आज १२७ व्या घटना दुरूस्तीच महत्वाच विधेयक मांडलं जाणार आहे. हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करण्याची विनंती शहांना केली. परंतु विरोधकांनी सध्या गोंधळ सुरू केला आहे. ते कामकाज होऊ देत नाही. किमान या बिला करीता तरी कामकाज होऊ द्यावं. ओबीसी आणि मराठा समाजासाठीचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला तत्काळ मान्यता दिली पाहिजे, असं ते म्हणाले. शहांसोबत इतर विषयांवरही चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विषय नाही

चंद्रकांत पाटील शनिवारपासून दिल्लीत आहेत. काल त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर दिले होते. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. (

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button