राजकारण

ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही : रामदास आठवले

मुंबई : उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांना गृह मंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले आहे. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर मोठे विधान केले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. इथे राष्ट्रपती राजवट लावली जावी. यासंबंधात मी राष्ट्रपतींना पत्र लिहिल्याचे ते म्हणाले.

आठवले यांनी सांगितले की, आता असे वाटत नाहीय की महाविकास आघाडी सरकार राज्यात आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नाहीय. देशात कोरोनाचे 60 ते 65 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. अशातच राज्य सरकारची स्थिती दोलायमान दिसू लागली आहे. गृह मंत्री अनिल देशमुखांना (Home Minister Anil Deshmukh) आधीच राजीनामा देण्याची गरज होती. मात्र त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. आता पवारांनीच देशमुखांना राजीनामा देण्यास परवानगी दिली ही चांगली बाब आहे, असे आठवले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button