शिक्षण

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा ३० ऑक्टोबरला होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत ३१ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. परिषदेकडून टीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर होणार असून आता ही परीक्षा ३० ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे.

३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभाग आणि (शिक्षक पात्रता परीक्षा) टीईटीची परीक्षा एकत्र आल्या आहेत. मी याबाबत वर्षा गायकवाड यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना विनंती केली आहे आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची आहे, त्यामुळे त्यांनी टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत विचार करावा अशी विनंती केली आहे. मी याबाबत शिक्षण संचालकांशीही बोलणार आहे. अजून एक महिना आहे, यातून मार्ग काढला जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल, असं राजेश टोपे म्हणाले होते. त्यानंतर लगेचच नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.

आरोग्य विभाग गट क आणि गट ड परीक्षा २५ आणि २६ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. परीक्षा आयोजित करण्याचं कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीच्या घोळामुळं परीक्षा लांबणीवर टाकण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या होत्या. २४ ऑक्टोबरला गट क आणि ३१ ऑक्टोबरला गट ड परीक्षा आयोजत करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीनं येणारी परीक्षा ३१ ऑक्टोबरला होणार आहे. दोन्ही परीक्षा एकादिवशी येणार असल्यानं दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी बोलताना मार्ग काढणार असल्याचं म्हटलं आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोलून आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची असल्यानं टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्यासाठी विनंती केली असल्याचं म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button