अर्थ-उद्योग

टाटा मोटर्सचे प्रवासी वाहन ग्राहकांसाठी ‘अनुभव’ मोबाइल शोरूम्‍स लाँच

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍डने आज ग्रामीण ग्राहकांना घरपोच कार खरेदी अनुभव देणारे शोरूम ऑन व्‍हील्‍स ‘अनुभव’ सादर केले. ग्रामीण विपणन धोरणाशी बांधील राहत हा उपक्रम तहसील व तालुकांमधील पोहोच वाढवण्‍यास मदत करेल, जेथे ग्रामीण लोकसंख्‍या व अर्थव्‍यवस्‍थेच्‍या संदर्भात उच्‍च क्षमता आहे. भारताच्‍या ग्रामीण भागामध्‍ये टाटा मोटर्स ब्रॅण्‍ड जागरूकता वाढवण्‍यासाठी देशभरात एकूण १०३ मोबाइल शोरूम्‍स तैनात करण्‍यात आले आहेत. हे मोबाइल शोरूम्‍स विद्यमान डिलरशिप्‍सना ग्राहकांना घरपोच विक्री अनुभव देण्‍यास मदत करण्‍यासोबत कार्स व एसयूव्‍हींची न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणी, अ‍ॅक्‍सेसरीजबाबत माहिती देण्‍यामध्‍ये, फायनान्‍स योजना उपलब्‍ध करून देण्‍यामध्‍ये, टेस्‍ट ड्राइव्‍ह बुक करण्‍यामध्‍ये आणि एक्‍स्‍चेंजसाठी विद्यमान कार्सचे मूल्‍यांकन करण्‍यामध्‍ये देखील मदत करतील.

याप्रसंगी बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि.चे विक्री, विपणन व कस्‍टमर केअरचे उपाध्‍यक्ष राजन अम्‍बा म्‍हणाले, आम्‍हाला अनुभव उपक्रम सुरू करण्‍याचा आनंद होत आहे. हे ब्रॅण्‍डला प्रगतीच्‍या दिशेने घेऊन जाण्‍यामध्‍ये आणि कार्स व एसयूव्‍हींची आमची न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणी अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍यासोबत पारंपारिकरित्‍या पालन केले जाणा-या ब्रिक-अॅण्‍ड-मोर्टर सुविेधेच्‍या मॉडेलवरील आमची अवलंबता कमी करण्‍यामध्‍ये लक्षणीय पाऊल आहे. हे मोबाइल शोरूम्‍स आमच्‍या कार्स, फायनान्‍स योजना, एक्‍स्‍चेंज ऑफर्स इत्‍यादी बाबत मा‍हितीचा शोध घेत असलेल्‍या ग्रामीण ग्राहकांसाठी एक थांबा सोल्‍यूशन असतील. ते आमच्‍या ग्राहकांपर्यंत पोहोच वाढवण्‍यासाठी आम्‍हाला ग्राहक अभिप्राय व डेटाची देखील माहिती देतील. भारताच्‍या ग्रामीण भागामधील विक्री देशामध्‍ये विक्री करण्‍यात आलेल्‍या एकूण पॅसेंजर वेईकल्‍समध्‍ये जवळपास ४० टक्‍के योगदान देतात आणि या संकल्‍पनेसह आम्‍हाला आमची पोहोच वाढवण्‍याचा, तसेच या बाजारपेठांमधील ग्राहकवर्गामध्‍ये वाढ होण्‍याचा विश्‍वास आहे.

टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍स फुली बिल्‍ट वेईकल्‍स (एफबीव्‍ही) डिव्हिजनच्‍या कौशल्‍यासह ‘अनुभव – शोरूम ऑन व्हील्‍स’ अत्‍यंत विश्‍वसनीय टाटा इण्‍ट्रा व्‍ही१० च्‍या आधारावर विकसित करण्‍यात आले आहे. डिलरशिप्‍स टाटा मोटर्सची देखरेख व मार्गदर्शनांतर्गत या मोबाइल शोरूम्‍सचे कार्यसंचालन पाहतील. सर्व डिलरशिप्‍सना या व्‍हॅन्‍स प्रवास करणा-या आणि लक्ष्‍य गाव किंवा तहसीलपर्यंत जाणा-या मार्गांसंदर्भात दर महिन्‍याला माहिती देण्‍यात येईल. या मोबाइल शोरूम्‍समध्‍ये सर्वोत्तम वापराकरिता हालचालीवर देखरेख ठेवण्‍यासाठी जीपीएस ट्रॅकर्स आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button