अर्थ-उद्योग

टाटा मोटर्सकडून अहमदाबाद जनमार्ग लिमिटेडला ६० अल्ट्रा अर्बन इलेक्ट्रिक बसेसची डिलिव्हरी

अहमदाबाद : शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देण्याप्रती आपली बांधीलकी आणखी दृढ करत टाटा मोटर्स या भारतातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने ६० सर्वोत्तम दर्जाच्या इलेक्ट्रिक बसेस अहमदाबाद जनमार्ग लिमिटेडला (एजेएल) डिलिव्हर केल्या आहेत. अहमदाबाद येथील साबरमती रिव्हर फ्रण्ट इव्हेंट सेंटरवरून, आज गुजरातचे माननीय मुख्यमंत्री श्री. भूपेंद्र पटेल आणि अहमदाबादचे माननीय महापौर श्री. किरीटकुमार परमार यांनी, टाटा अल्ट्रा ९/९ एसी बसेसना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी गुजरात राज्य सरकार, एजेएल आणि टाटा मोटर्सचे अधिकारी उपस्थित होते. एजेएलशी झालेल्या ग्रॉस कॉस्ट काँट्रॅक्टखाली (जीसीसी) या २४ आसानी शून्य कार्बन उत्सर्जन बसेसचा पुरवठा करण्यात आला आहे आणि त्या अहमदाबादच्या बस रॅपिड ट्रांझिट सिस्टम (बीआरटीएस) कॉरिडॉरवरून धावणार आहेत. टाटा मोटर्स यासाठी आवश्यक ती चार्जिंग संरचनाही आणि बसेसच्या सुरळीत कार्यासाठी सपोर्ट सिस्टम्सही स्थापन करून देणार आहे.

टाटा अल्ट्रा अर्बन ९/९ इलेक्ट्रिक बसेसना पूर्णपणे इलेक्ट्रिक इंजिनांचे पाठबळ आहे. या इंजिनची कमाल शक्ती ३२८ हॉर्सपॉवर व कमाल टॉर्क ३००० एनएम आहे. या बसेसमधील प्रशस्त अंतर्गत रचना देखण्या अंतर्गत प्रकाशयोजनेने युक्त आहे आणि कार्यात्मकता व नियम यांच्यानुसार ती कस्टमाइझ केली जाऊ शकते. क्लच आणि गीअर बदलण्याचा त्रास न घेता अजिबात थकवा न आणणारा ड्रायव्हिंग अनुभव देण्याच्या दृष्टीने या बसेस डिझाइन करण्यात आल्या आहेत. अल्ट्रा अर्बन ९/९ ई-बसेस रिजनरेटिव ब्रेकिंग प्रणाली, अत्याधुनिक टेलिमॅटिक्स आणि उच्च सुरक्षा असलेली इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (आयटीएस) यांनी सुसज्ज आहेत. त्यामुळे बसेस कार्य अधिक सुरळीतपणे व कार्यक्षमतेने काम करू शकतील.

टाटा मोटर्सच्या बसेस या प्रोडक्ट लाइनचे उपाध्यक्ष रोहित श्रीवास्तव म्हणाले, एजेएलला टाटा अल्ट्रा अर्बन ९/९ बसेस डिलिव्हर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण आणि भविष्यकालीन वाहनांच्या रचनेमध्ये शाश्वततेचा समावेश करणे यांच्याप्रती असलेल्या सातत्यपूर्ण बांधिलकीमुळे, टाटा मोटर्सने देशाच्या इलेक्ट्रिक वाहतुकीच्या दिशेने चाललेल्या प्रवासाचे नेतृत्व केले आहे. अल्ट्रा अर्बन ९/९ बसेस या अधिक आराम, सुरक्षितता व कार्यक्षमता देण्याच्या दृष्टीने घडवण्यात आल्या आहेत. तसेच या बसेस अजिबात आवाज न करता आणि कार्बन उत्सर्जन न करता धावणाऱ्या आहेत. या बसेसच्या डिलिव्हरीमुळे एजेएलसोबतचा आमचा फलदायी सहयोग अधिक दृढ होणार आहे आणि अहमदाबादमध्ये पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीलाही यामुळे उत्तेजन मिळणार आहे.

एजेएलच्या मते, नवीन बसेस अहमदाबाद शहरातील नव्याने विकिसत होणाऱ्या भागांत तसेच विमानतळाकडे जाणाऱ्या नवीन मार्गावर सेवा देतील. या बसेस प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देतील आणि अहमदाबादच्या सर्व नागरिकांना शून्य कार्बन उत्सर्जन वाहतुकीचा पर्याय पुरवतील. टाटा मोटर्स हा कायमच विश्वासार्ह सहयोगी राहिला आहे आणि आमच्या आवश्यकतेप्रमाणे कंपनीने इलेक्ट्रिक बसेस पुरवल्या आहेत. या भागीदारीमुळे कंपनीसोबतचे संबंध अधिक दृढ होतील, असा आत्मविश्वास एजेएलने व्यक्त केला.

भारतात पर्यावरणपूरक वाहतूक आणण्यामध्ये टाटा मोटर्स अग्रेसर आहे. कंपनीची अत्याधुनिक संशोधन व विकास आस्थापने पर्यायी इंधन तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी भविष्यकालीन वाहने डिझाइन करण्यावर सातत्याने काम केले आहे. यांमध्ये बॅटरी-इलेक्ट्रिक, हायब्रिड, सीएनजी, एलएनजी आणि हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान आदींचा समावेश आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला १५ हायड्रोजन फ्युएल सेल बसेस पुरवण्याची ऑर्डर कंपनीला नुकतीच मिळाली आहे. देशात शाश्वत वाहतुकीची साधने जास्तीत-जास्त प्रमाणात आणण्यासाठी कंपनी कायम प्रयत्नशील आहे. आजच्या तारखेपर्यंत टाटा मोटर्सने भारतातील अनेक शहरांमध्ये ६०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे आणि या सर्व वाहनांनी एकत्रितपणे २० दशलक्ष किलोमीटर्सहून अधिक अंतर कापले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button