आरोग्य

फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली होती कोरोना लस !

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या २५ वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नांचं वादळ उठलं होतं. १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. मात्र, त्यापूर्वीच पंचविशीतील तरुणाला लस कशी मिळाली? असा सवाल विरोधकांकडून त्यावेळी विचारण्यात येत होता. या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका झाली. दरम्यान, फडणविसांसोबत पुतण्याचं नातं असलेल्या तन्मनने आरोग्य कर्मचारी असल्याचं सांगत कोरोनाची लस घेतल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.

तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी असल्याचं भासवून कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्याने लसीकरणापूर्वी आपण आरोग्य कर्मचारी असल्याची नोंदणी केली, अशी माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर इथले माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती मागवली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार तन्मय याने आरोग्य कर्मचारी असल्याचं भासवत कोरोना लस टोचून घेतली आहे. प्रत्यक्षात तन्मय फडणवीस याच्या ट्विटर फ्रोफाईलवर अभिनेता असा उल्लेख आहे.

तन्मय फडणवीस आपला दूरचा नातेवाईक आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत हात झटकले होते. तन्मय फडणवीस याने नियम तोडून लस कशी घेतली, हे आपल्याला माहीत नसल्याचे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं होतं. तन्मय अभिजीत फडणवीसच्या बाबतीत मी लेखी निवेदन दिलं आहे. त्यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही, असं फडणवीस म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button