आरोग्य

देशद्रोही बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करा; ‘आयएमए’चे मोदींना पत्र

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशन (‘आयएमए’) ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पतंजलीचे मालक योग गुरू बाबा रामदेव यांच्या विरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई करण्याची मागणी केली आहे. पत्रात आयएमएने म्हटले आहे की, रामदेव यांच्याद्वारे चुकीच्या सूचना आणि माहिती देणारे अभियान रोखले पाहिजे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही १० हजार डॉक्टर आणि लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, असे बाबा रामदेव यांनी वक्तव्य केले असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे रामदेव यांच्याविरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली कारवाई करा.

पंतप्रधान मोदी यांच्या नावे इंडियन मेडिकल असोसिएशनने आपल्या पत्रात लिहिले आहे की, आयएमए सातत्याने १८ वर्षे वयोगटातील लसीकरण करण्यासाठी तुमच्या वचनबद्धतेविषयी संदेश देत आहे. भारत सरकार आणि मॉर्डन मेडिकल हेल्थ केअर व्यावसायिकांमुळे आजपर्यंत भारतात २० कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. जगातील हे सर्वाधिक वेगवान लसीकरण आहे. आम्ही भारतात लस बनवण्यासाठी आणि इतर देशांतून लसीचे डोस भारतात वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल तुमचे आभारी आहोत. तसेच एक दिलासादायक बाब म्हणजे ज्या लोकांनी लसीचा डोस घेतला आहे, त्यामधील ०.०६ टक्के लोकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे पाहण्यास मिळाली आहेत आणि खूप कमी लोकांमध्ये फुफ्फुसात संसर्ग झाला. त्यामुळे लस आपल्या अनेक लोकांचा जीव वाचत आहे, हे सिद्ध झाले आहे. तसेच देशात गंभीर संक्रमणाच्या प्रकरणात कमी करू शकतो.

आयएमएने पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनात लसीकरणाच्या उपयुक्तेबद्दल आणि कोरोना उपचारासाठी दिलेल्या सल्लाबद्दल आभार मानले आहेत. शिवाय आयएमएने रविवार होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी तसे बोलण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button