अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवरील छापेमारीनंतर सुप्रिया सुळे, संजय राऊत आक्रमक
पुणे/मुंबई : अनिल देशमुखांच्या घरावरील छापा प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे, तसेच शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. भाजपकडून सत्तेचा एजन्सीचा गैरवापर केला जात आहे असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे, तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. ‘सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?’, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला.
पुण्यामध्ये सुळे म्हणाल्या, राजकारण हे विचारांचं असतं आणि लोकांच्या सेवेसाठी असतं.आजपर्यंत या देशात एजन्सीचा वापर आपल्या विरोधकांसाठी झालेला पाहिला नाही,ऐकलेला नाही.एजन्सीचा गैरवापर ही त्यांची स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे. भाजपची सत्ता आल्यापासून पवार साहेबांना पण नोटीस आली होती,अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. महाराष्ट्रात अस राजकारण कधी होत नाही,महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर कधीही विरोधकाना त्रास देण्याकरता केला नाही. ही नवीन एसओपी ज्याला म्हणता ती स्टाईल काढलेली आहे. हे जाणून बुजून केलं जातं आहे हे दिसते आहे.
सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडी विकासाचे राजकारण करत आहे.आम्ही कोरोना तिसऱ्या लाटेसाठी काम करत आहोत. वैयक्तिक आम्ही कधी राजकारण आम्ही कधी करत नाही करणाऱ नाही.
संजय राऊत भडकले !
अनिल देशमुख यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. मला वाटतं हे सगळं सत्ताप्रेरित आहे. सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का , ईडी आणि सीबीआयची बदनामी होतेय, हे संबंधितांनी लक्षात घ्यावं. प्रताप सरनाईक यांच्याबाबतीतही तेच झालं. अशा गोष्टींमुळे विनाकारण त्रास होतो. विनाकारण त्रास हा शब्द सरनाईक यांच्या पत्रात देखील होता. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नाहीय, अशी आठवण राऊतांनी करुन दिली.
सीबीआय तपास करायचाच असेल तर अयोध्येच्या महापौरांनी अयोध्या मंदिर ट्रस्टसोबत जो व्यवहार केला, त्या प्रकरणाचा तपास करा. ती केस सीबीआयसाठी फिट आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
सध्या अघोषित आणीबाणी
आणीबाणीला विसरा आता. त्याचा बाऊ करु नये.. इंदिरा गांधी यांनी थेट आणीबाणी लावली होती. सध्या अप्रत्यक्ष आणीबाणी वाटते. राष्ट्रहितसाठी कठोर व्हायला हवं, असंही राऊत म्हणाले.