नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) मध्ये महिलांना प्रवेश का नाही?; सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टानं नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यासंदर्भातील याचिकेवर बाजू मांडण्यासाठी केंद्राला नोटीस काढली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरु होती.
नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये अॅड. कुश कार्ला जनहित याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या बेचसमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं संरक्षण मंत्रालय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन डिफेन्स अकॅडमीला नोटीस काढली आहे.
सुप्रीम कोर्टान फेब्रुवारी 2020 मध्ये इंडियन आर्मीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि पर्मनंट कमिशनमध्ये महिलांना सेवा जॉईन करण्यास मंजुरी दिली होती. त्या निर्णयाच्या आधारे याचिका दाखल केल्याचं अॅड. कार्ला यांनी म्हटलं आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश नाकारणं हे त्यांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणणारं आहे. नागरिक म्हणून महिलांना समान संधी असणं गरजेचे आहे, असं कार्ला यांनी याचिकेत म्हटलंय.