राजकारण

१२ निलंबित आमदारांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांनी बेशिस्त वर्तवणुक केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधानसभेत निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईला भाजप आमदारांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. या प्रकरणातील सुनावणी आज होणे अपेक्षित होते. पण वेळेअभावीच ही सुनावणी पुढे ढकलली आहे. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी ही कारवाई झाली होती. याचिकाकर्त्या भाजपच्या वकिलांकडूनच वेळेअभावी ही याचिका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली.

राज्यातील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १२ आमदारांना गैरवर्तन केल्यामुळे १ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. शिवसेना आमदार आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव कामकाज पाहत असताना ओबीसी आरक्षणावरुन भाजप सदस्यांनी गोंधळ घातला. सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली आणि नंतर अध्यक्षांच्या चेंबरमध्ये धक्काबुक्की केली असल्याचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले. विधानसभेत त्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित केले होते.

पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया या आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button