स्टॅनप्लसची सिरीज एमध्ये २० दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी
मुंबई : स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या इमर्जन्सी मेडिकल रिस्पॉन्स कंपनीने व्यापक सिरीज ए गुंतवणूकीमध्ये २० दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे. मार्की गुंतवणूकदार, जसे हेल्थक्वॉड, कलारी कॅपिटल आणि हेल्थएक्स कॅपिटल सिंगापूर यांनी राऊंडचे नेतृत्व केले. पेगासस, संदीप सिंघाल (अवाना) आणि प्रशांत मलिक यांच्यासह एंजल गुंतवणूकदारांच्या समूहाने देखील सहभाग घेतला. या राऊंडमध्ये एन+१ कॅपिटलकडून कर्ज फंडिंगचा देखील समावेश आहे. तसेच कंपनीने ग्रिप इन्वेस्टकडून २ दशलक्ष डॉलर्स निधी देखील उभारला, जो रूग्णवाहिका भाडेतत्त्वावर देण्यासाठी वापरण्यात येईल.
हेल्थकेअर विभागामध्ये उभारण्यात आलेला हा सर्वात मोठा सिरीज ए निधी आहे. स्टॅनप्लसची कार्यसंचालने ५०० हॉस्पिटल्सपर्यंत वाढवण्यासाठी, सध्याच्या ५ शहरांवरून १५ शहरांपर्यंत त्यांचा प्रमुख रेड अॅम्बुलन्स ब्रॅण्ड विस्तारित करण्यासाठी या भांडवलामधील वाढीचा लाभ घेण्यात येईल. स्टॅनप्लसचा विद्यमान रूग्णवाहिका ईटीए सध्याच्या १५ मिनिटांवरून ८ मिनिटांपर्यंत कमी करण्याचा आणि इतर रूग्णवाहिका सेवा प्रदात्यांद्वारे सरासरी ४० मिनिटांपेक्षा कमी करण्याचा मनसुबा आहे. त्यांचे हायब्रिड फ्लीट मॉडेल जलद विकासाची सुविधा देत जागतिक दर्जाचे वैद्यकीय मानक राखते.
स्टॅनप्लसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभदीप सिंग म्हणाले, “भारतामध्ये किराणा माल १० मिनिटांमध्ये डिलिव्हर केला जातो, पण रूग्णवाहिकेला ४५ मिनिटे लागतो. स्टॅनप्लसमध्ये आम्ही ८-मिनिट अॅम्बुलन्स पॅराडिग्मवर फोकस करत आहोत. मी या सुविधेला ‘फर्स्ट मिनिट, लास्ट माइल’ हेल्थकेअर म्हणेन. हे भांडवल आम्हाला भारतातील उपलब्धता वाढवण्यामध्ये, या मिशनमध्ये काम करण्यास अभूतपूर्व प्रतिभांना प्रकाशझोतात आणण्यामध्ये आणि जागतिक दर्जाची तंत्रज्ञाने निर्माण करण्यामध्ये मदत करेल.”
भारतातील इमर्जन्सी रिस्पॉन्स उद्योगक्षेत्र मोठे आहे आणि त्याचे मूल्य १५ बिलियन डॉलर्स आहे. उच्च खंडित बाजारपेठेतील पोकळी भरून काढत स्टॅनप्लसने रेड हेल्थ व्यासपीठाची निर्मिती केली आहे, ज्यामुळे मोठे हॉस्पिटल्स, हेल्थ-अॅप्स, वीअरेबल्स, कार्स आणि इतर कोणतीही परिसंस्था कंपनीला प्लग-अॅण्ड-प्ले वैद्यकीय प्रतिसाद देता येतो.