स्पोर्ट्स

प्रेयसीसोबतच्या संबंधांची टेप लीक; सनथ जयसूर्या अडचणीत

कोलंबो : क्रिकेटच्या मैदानावर धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या सनथ जयसूर्याच्या नावावर खासगी जीवनात मात्र काही गंभीर आरोप करण्यात आले. ज्यात कधी भ्रष्टाचार तर कधी चुकीची कृत्य असे विविध आरोप होते. यातीलच एक आरोप म्हणजे त्याच्या एकेकाळी प्रेयसी असणाऱ्य़ा मलिका सीरिसेनाने त्याच्यावर त्यांची सेक्स टेप लिक केल्याचा आरोप केला होता. तिच्यासोबत जयसूर्या विवाहबाह्य संबधात असल्याचही समोर आलं होतं.

हा सर्व प्रकार २०१७ मधील असून त्यावेळी अनेक प्रसारमाध्यमांनी प्रेयसीसोबत बदला घेण्यासाठी स्वत:च व्हिडीओ लिक केल्याचा दावा केला होता. कोलंबो टेलीग्राफमध्ये छापलेल्या एका आर्टीकलनुसार, मलिकाने आपल्या काही जवळच्या व्यक्तींना सर्व प्रकार सविस्तर सांगितला. एका छोट्याशा मंदिरात जयसूर्या माझ्याशी साखरपुडा करत होता. त्याचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नसतानाही तो असं करत होता हे गंभीर होतं. तेव्हा तो केवळ एक क्रिकेटर नसून महिंदा राजपक्षाच्या सरकारमध्ये मंत्री देखील होता. मात्र हे सर्व प्रकरण दाबण्यात आल्याचही मलिकाने सांगितले.

सनथ जयसूर्या हे श्रीलंकेच्या क्रिकेटसह जागतिक क्रिकेटमधील एक मोठं नाव. जयसूर्याने श्रीलंका संघाकडून अनेक वर्षे स्फोटक फलंदाजी केली. गोलंदाजीतही त्याने चांगली चमक दाखवत श्रीलंकेला अनेक सामने जिंकवून दिले. ९० च्या दशकातील सर्वात वेगवान शतक आणि अर्धशतक जयसूर्याच्याच नावावर होते. १९९६ ला विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकन संघातही जयसूर्या होता. त्याने एकूण ५८६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्यात ११० कसोटी, ४४५ एकदिवसीय आणि ३१ टी-२० सामन्यांचा समावेश होतो. ज्यात एकूण ४४० विकेट्सह २० हजार ८५९ रन्स काढल्या.

सनथ जयसूर्या याचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने भारताविरुद्ध १० कसोटी सामन्यांत ६७ च्या सरासरीने ९३८ धावा केल्या आहेत. तर ८९ एकदिवसीय सामन्यांत २ हजार ८९९ धावा कुटल्या आहेत. १९९७ च्या पेप्सी कपमध्ये त्याने भारताच्या २२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकहातीच १५१ धावा काढल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button