इतर

राज्यात विकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद; रस्ते, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊनची मुंबईसह राज्यात कडक अंमलबजावणी होताना दिसत आहे. कालपर्यंत गर्दी गजबजलेले मुंबईचे रस्ते आणि रेल्वे स्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे, तर ठाणे, कल्याण डोंबिवलीसह सातरा, नांदेड, कोल्हापूर, नागपूर जिल्हातही नागरिक विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देत आहेत.

राज्यात दोन दिवसांचा कडकी लॉकडाऊन असतानाही मुंबईतील दादर फूल मार्केट, भाजीमार्केट परिसरात खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात नागरिकांनी गर्दी केली आहे. गुढीपाडवा सण जवळ अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपल्याने दादरच्या मीनाताई ठाकरे मार्केटफूलमध्ये विक्रेत्यांची फुलांची पार्सल विविध जिल्ह्यांमध्ये पाठवण्यासाठी घाई सुरु आहे. यात खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दीही मोठ्याप्रमाणात दिसत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक दोन दिवसाचा विकेंड लॉकडाऊन गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.

पालघर जिल्ह्यात दोन दिवसाच्या टाळेबंदीची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत आहे . पालघर जिल्ह्यातील पालघर, बोईसर, डहाणू सारख्या मोठ्या शहरात सध्या बाजारपेठा कडकडीत बंद असून या ठिकाणी तपासणी नाक्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

दोन दिवशीय लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो आणि रेल्वे स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रोज हजारोच्या संख्येने प्रवास करणाऱ्या मुंबई मेट्रो आणि लोकलमध्ये आज हातावर मोजण्याइतकी प्रवासी दिसत आहेत. सामान्य नागरिकांना मेट्रो आणि रेल्वेने प्रवासाची मुभा असतानाही नागरिक कडक लॉकडाऊनचे पालन करताना दिसत आहे.

विकेंड लॉकडाऊनमुळे रेल्वे प्रवासाची मुभा आहे की नाही अशा संभ्रमात सापडलेल्या मुंबईकरांनी आज बेस्टचा आधार घेतला. या लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेल नाहीत. परंतु तरीही अनेक नागरिक लोकलपेक्षा बेस्ट बसने प्रवास करण्या प्राधान्य देत आहेत. त्यामुळे आज अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. सध्या लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवरुन नागरिकांमध्ये अजूनही संभ्रमाची स्थिती आहे.

ठाण्यातील शुकशुकाट
ठाण्यात विकेंड लॉकडाऊन नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो. तलावपाली, चिंतामणी चौकसारखा परिसर आज शांत आहे. पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. काही अपवाद वगळता ठाणेकरांनी वीकेण्ड लॉकडाऊनचे पालन करत आहेत. तलावपाली, चिंतामणी चौकसारखा परिसर आज शांत आहे. पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. काही अपवाद वगळता ठाणेकरांनी वीकेण्ड लॉकडाऊन ला चांगला प्रतिसाद दिला आहे. सर्वात गर्दीचे ठिकाण असलेल्या जांभळी नाका येथील मार्केटसह सर्व मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत. स्टेशन रोड परिसरात असलेले सर्व दुकाने बंद आहेत. मुख्य भाजी मंडई बंद आहे. तर धान्य मार्केट देखील बंद आहे. पोलिसांनी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले आहेत. आहेत. कापूरबावडीसारख्या जंक्शनवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. भिवंडी आणि घोडबंदर रोडवरुन येणाऱ्या वाहनचालकांची चौकशी पोलीस करत आहेत. अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना पुढे ठाण्यात पाठवले जात आहे. विनाकारण बाहेर पडलेल्यांना पुन्हा घरी पाठवले जात आहे.

कल्याण-डोंबिवलीत विकेंड लॉकडाऊनला बगल
कल्याण-डोंबिवली शहरात देखील लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. शुक्रवारी रात्रीपासूनच लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन पोलीस यंत्रणेसह महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आज सकाळच्या सुमारास शहरातील रस्त्यावर तूरळक नागरिक दिसून येत आहे. मात्र काही नागरिकांना मॉर्निंग वॉकला बगल दिला आहे. कल्याणचा काळा तलाव बंद करुनही या परिसरात नागरिकांनी मॉर्निंग वॉकसाठी हजेरी लावली होती. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती दिवसागणिक वाढत आहे.

मिरा भाईंदर, वसई विरारमध्ये पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त
मिरा, भाईंदर आणि वसई विरार शहारातही विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या ठिकाणच्या शहारातील नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त असून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण नागरिकांना घराबाहेर पडण्यास नागरिकांना रोखले जात आहे. मिरा भाईंदर, वसई विरार पालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

नांदेड जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनचा फज्जा
नांदेड जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊनचा पुरेपुर फज्जा उडाला आहे. जिल्ह्यात बाजारपेठा आणि व रस्त्यांवर नागरिकांची व वाहनांची मोठ्या गर्दी पाहायला मिळतोय. त्यामुळे राज्य शासनाने घोषणा केलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनचा नांदेडकरांनी फज्जा उडवल्याचं चित्र आहे.

साताऱ्यात चांगला प्रतिसाद; रस्ते ओस, सर्व दुकानं बंद
साताऱ्यात विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. साताऱ्यातील रस्ते ओस पडले असून पोलिसांकडून नाक्यानाक्यावर तपासणी सुरु आहे. घराबाहेर पडलेल्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. तर सर्व दुकाने बंद आहेत.

कोल्हापूरात काटेकोरपणे पालन, चौकाचौकात शुकशुकाट
कोल्हापूरात विकेंड लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन होताना दिसतेय. कोल्हापूर शहराच्या चौकाचौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जात आहे. नागरिकांनी देखील या दोन दिवसांच्या लॉकडाऊनला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शहरातल्या चौकात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button