Top Newsराजकारण

लवकरच महिला पोलिसांच्या कामाचे तास १२ वरून ८ होणार !

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिला पोलिसांच्या कामाचे तास १२ वरून ८ करण्यात येणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

सध्या पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या महिलांना १२ तास काम करावे लागत आहे. महिला पोलिसांना कामाबरोबरच कुटुंबाची जबाबदारी देखील पार पाडत तारेवरची कसरत करावी लागते. अनेक वेळा सणासुदीच्या दिवशी, बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा १२ तासापेक्षा जास्त कर्तव्य पोलिसांना बजवावे लागते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास बारा तासांहून आठ तास करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून पोलीस दलासाठी एक खुशखबर आहे. यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये चांगला असा ताळमेळ घालणं शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button