कोरोना नियमांचे उल्लंघन; आ. गोपीचंद पडळकरांवर गुन्हा

सोलापूर : सोलापुरात संचारबंदी लागू असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर पोलिसांनी भांदवि कलम १८८, ३३६, २६९ नुसार गुन्हा दाखल केलाय. पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पडळकर यांच्या गाडीवर काल सोलापुरात दगडफेक झाली होती. त्यानंतर पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अंगुलीनिर्देश केलाय. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेकून पळ काढणाऱ्याचा फोटो समोर आलाय. दगडफेक करणारा तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे पडळकर यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पडळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर जरुर करा. पण मग हिंमत असेल तर पुण्यात हजारोंची गर्दी जमा करणाऱ्या अजित पवारांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.