भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार लवकरच आयोगासमोर बाजू मांडतील : मलिक
मलिकांचे पाय हायकोर्टात थरथरत होते; मोहित कंबोजचे ट्विट

मुंबई : येत्या काही दिवसात माझी बाजू मांडण्यासाठी आयोगासमोर येणार असल्याचे शरद पवार यांनी लेखी पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांना आयोगाने बोलावले होते. परंतु चौकशी आयोगासमोर येता येत नाही. येत्या काही दिवसातच माझी बाजू मांडणार आहे अशी माहिती त्यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे शरद पवार नक्कीच आयोगासमोर हजर होतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
दोन वर्षानंतर कोरोनाबाबत दिलासादायक परिस्थिती राज्यात निर्माण झाली असून जनतेच्या सहकार्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.
राज्यात जवळपास ८०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बहुतेक रुग्ण हे लक्षणे असलेले असले तरी ते होमक्वॉरंटाईन आहेत. मुंबईत डबल डिजिट आकडा आला आहे. ही सगळी परिस्थिती पाहता याबाबत पुढील काळात कोणते निर्देश द्यायचे हे आरोग्य विभाग आणि मदत व पुनर्वसन विभाग प्रस्ताव तयार करतील आणि मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतील असेही नवाब मलिक म्हणाले.
मलिकांचे पाय हायकोर्टात थरथरत होते, अन् वारंवार माफीही मागितली; मोहित कंबोजचे ट्विट
समीर वानखेडे आणि कुटुंबियांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी हमी देऊनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून बदनामी सुरू असल्याची याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान नवाब मलिक एक तास हायकोर्टाच्या न्यायमूर्तीच्या समोर विटनेस बॉक्समध्ये उभे होते. पाय कापत होते आणि वारंवार माफीही मागत असल्याचा दावा मोहित कंबोजने केला आहे.
सुना है कल मियाँ नवाब मलिक High Court में Justice के सामने 1 घंटा कटघरा में खड़े रहे , पैर काँप रहे थे , और बार बार माफ़ी माँग रहे थे !
बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी !
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) February 22, 2022
नवाब मलिक यांनी सोमवारी हायकोर्टाने बजावलेल्या नोटीशीला हजर राहत आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी आधीच्या सुनावणीत मलिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच नोटीशीला उत्तर देण्याचे सांगितले होते. म्हणूनच प्रतिज्ञापत्रासह नवाब मलिक स्वतः सुनावणीसाठी हजर होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान करत वारंवार समीर वानखेडे आणि कुटुंबीयांची बदनामी करत असल्याची याचिका ज्ञानदेव वानखेडे यांनी केला होता. याच प्रकरणातील सुनावणी सोमवारी आयोजित करण्यात आली होती. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समीर वानखेडे यांची बदनामी करणे थांबवा अशा शब्दात हायकोर्टाने नवाब मलिक यांचे कान टोचले आहेत. समीर वानखेडेंच्या माध्यमातून केंद्रीय तपास यंत्रणेच्या दबावतंत्रावर बोलण्याचा आपला अधिकार अबाधित असल्याचा दावा नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र या स्पष्टीकरणावरही हायकोर्टाने असमाधान व्यक्त केले आहे.
राजकारणातील सलीम जावेद असा उल्लेख नवाब मलिक आणि संजय राऊतांच्या जोडीचा मोहित कंबोजने केला होता. आधी खोटे आरोप करायचे, पत्रकारांनी प्रश्न विचारले की लालबूंद व्हायचे. हाच सलीम जावेद यांचा खरा चेहरा आहे. रोज सकाळचा मॅटिनी शो बंद व्हायला हवा असेही एक ट्विट मोहित कंबोजने केला होता.




