स्पोर्ट्स

ज्येष्ठ कबड्डी खेळाडू मुरारी कदम यांचे निधन

ठाणे : कोकणचे सुपुत्र मुरारी कदम यांचे नुकतेच निधन झाले. मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले सचिन कदम यांचे ते वडील. हाफकिनमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक बांधिलकीचा ध्यास शेवटपर्यंत जपला.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील अडरे हे मुरारीराव कदम यांचे मूळ गाव, कबड्डीला सुरूवातीच्या काळामध्ये हुतूतू नावाने ओळखले जायचे. त्यानंतर अनेक सुधारणा या खेळांमध्ये करण्यात आल्या. कबड्डी नावाला एक वलय प्राप्त झाले . परंतु आपल्या या समाजामध्ये असेही काही खेळाडू ज्यांनी कबड्डीच्या सुरूवातीच्या दिवसात म्हणजे हुतूतूपासून सुरुवात करून कबड्डीमध्ये नावलौकिक मिळवला, त्यात मुरारी कदम यांचा उल्लेख करावा लागेल. वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणेजच ६० च्या दशकात त्यांनी खेळायला सुरूवात केली. मुंबईतील यंग प्रभादेवी संघ या नावाजलेल्या कबड्डी संघातून त्यांनी मैदान गाजवले. कारकीर्दीच्या सुरूवातीला पार्ला कॉलेजमधून शिक्षण घेत असताना मुंबई युनिव्हर्सिटीसाठी त्यांची निवड झाली. कबड्डी खेळत असताना १९६२ साली हाफकिन बायो फार्मसी फार्मासिटिकल या कंपनीमध्ये खेळाडू म्हणून ते तेथे नोकरीस रूजु झाले. त्यानंतर हाफकिन स्पोर्टस्मधून खेळत असताना त्यांनी अनेक व्यावसायिक स्पर्धामध्ये मैदाने गाजवून अनेक वेळा त्यांच्या कंपनीला विजतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. तसेच अखिल भारतीय सचिवालयमध्ये सतत दोन वर्षे त्यांची निवड झाली. हाफकिनमध्ये खेळत असताना त्यांना संपूर्ण भारतभर कबड्डी खेळण्यासाठी संधी मिळत होती . या संधीचे त्यांनी सोने केले. तसेच महाराष्ट्र कबड्डी संघटनेसाठी त्यांनी केलेले योगदान अफाट होते. त्यामुळे कबड्डी क्षेत्रातील नामांकित खेळाडू, तसेच संघटनेचे पदाधिकारी कायम त्यांचा आदर करत होते. अशा या हरहुन्नरी खेळाडूने त्यांच्या जीवनातील सतत ३५ वर्षे कबड्डी खेळाने अनेक मैदाने गाजवली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button