
नवी दिल्ली : १०२ व्या घटनादुरूस्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करणारे १२७ वे दुरूस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ आज राज्यसभेतही पारित झालं. या पार्श्वभूमीवर आता एखादा समाज मागास आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांच्या अखत्यारीत असण्याला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. दरम्यान, आज राज्यसभेत या विधेयकावरील चर्चेदरम्यान एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. भाजपचे सहयोगी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बोलू देण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले होते.
१२७ वे दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत ते मांडण्यात आलं. यावेळी आरक्षण विधेयकावर खथासदार संभाजीराजे छत्रपती यांना बोलू न दिल्यानं आज राज्यसभेत जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. रितसर विनंती करुनही भाजपच्या यादीत वक्ता म्हणून संभाजीराजे यांचं नाव नव्हतं. सभागृहात चर्चा संपत असताना विरोधी पक्षनेते बोलण्यासाठी संभाजीराजे उठून उभे राहिले आणि त्यांनी निषेध नोंदवला.
महत्वाची बाब म्हणजे यावेळी शिवसेनचे खासदार संजय राऊत संभाजीराजे यांच्या समर्थनासाठी उठून उभे राहिले आणि त्यांनी संभाजीराजे यांना बोलू देण्यासाठी जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे राज्यसभेत आज भाजपच्या सहयोगी खासदारांना बोलू देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरल्याचं दिसून आल्याचं गमतीशीर चित्र सभागृहात पाहायला मिळालं. शाहू महाराजांचा वंशज आहे. ज्यांनी देशात पहिलं आरक्षण दिलं असं सांगत संभाजीराजेंनी दोन मिनिटे बोलू द्यावं अशी विनंती केली. त्यानंतर तालिका सभापतींनी अखेर त्यांना २ मिनिटांची वेळ दिली.