Top Newsराजकारण

‘समीर दाऊद वानखेडे’, नवाब मलिक म्हणाले ‘फ्रॉड इथूनच सुरू होतो’ !

समीर वानखेडे यांच्याकडून पहिल्या लग्नाची कबुली

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आता दररोज नवनवे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी तर एनसीबीनं केलेली कारवाई फेक असल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. त्यात एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत मलिकांकडून रोज खळबळजनक आरोप केले जात आहेत. त्यात आता आणखी एका दाव्याची भर पडली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा कथित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्याशी विवाहबंधनात अडकण्याआधी समीर वानखेडे यांचा डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी विवाह झाला होता असा दावा केला जात आहे.

मंत्री नवाब मलिक यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. त्यावर पैचान कोन? असा सवाल केला आहे. तर दुसऱ्या एका ट्विटरमध्ये काही कागदपत्रंही ट्विट करुन ‘यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा’, असंही मलिक यांनी म्हटलं आहे. यात त्यांनी वानखेडे यांचं ‘समीर दाऊद वानखेडे’ या संपूर्ण नावाचा उल्लेख केला आहे.

नवाब मलिक यांनी एका ट्विटमध्ये महापालिकेचा एक सर्टिफिकेट ट्विट केलं आहे. तो कागद नेमका कशा संदर्भातील आहे हे स्पष्टपणे दिसत नाही. पण तो ट्विट करताना नवाब मलिक यांनी ‘समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा इथूनच सुरू झाला’, असं कॅप्शन दिलं आहे. मलिक यांनी ट्विट केलेलं सर्टिफिकेट हे विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, हे सर्टिफिकेट नेमकं कशाचं आहे याला अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, नवाब मलिक याच संदर्भात आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन नवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे.

‘त्या’ लग्नाच्या फोटोबाबत समीर वानखेडेंचे मोजक्या शब्दात उत्तर

नवाब मलिकांच्या या नव्या आरोपावर समीर वानखेडे यांनी मोजक्याच शब्दात भाष्य करत त्याला उत्तर दिलं आहे. वानखेडे म्हणाले की, २००६ मध्ये माझं लग्न झालं होतं आणि कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन मी दुसरं लग्न केलं, ज्या महिलेसोबत मी संसार केला नाही त्या महिलेचा फोटो वापरून कुटुंबावर हल्ला केला जातोय. माझ्यावर कितीही शिंतोडे उडवायचे ते उडवा. तपास भरकटवण्याचा प्रकार आहे. अतिशय खालच्या दर्जाची चिखलफेक सुरू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button