राजकारण

फडणवीसांनीही तौक्ते नुकसानग्रस्तांसाठी केंद्राला पत्र लिहावे : आ. रोहित पवार

बारामती : तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रासह इतर दोन राज्यांतही मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल अशी अपेक्षा आहे. राज्य सरकार तौक्ते नुकसानग्रस्तांना मदत करेलच, मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. ते बारामतीत बोलत होते.

तौक्ते चक्रीवादळाने गुजरात आणि महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच फक्त गुजरात राज्यासाठी मदत ही जाहीर केली. त्यामुळे महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल, अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहे. यासाठी विरोधी पक्षनेत्यांनीही केंद्राला पत्र लिहावं, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकार बरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्यसरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल, अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली.

अखंड जगावर कोरोनाचे संकट असताना देशात दिवसाला चार लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. अशा वेळी भारतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. तसेच विविध कार्यक्रमात ठिकठिकाणी मोठी गर्दी होत होती. या सगळ्या गोष्टींमुळे देशवासियांना लसीची गरज असताना लसीचे उत्पादन वाढायला देश कमी पडला. या बाबतच्या चर्चा भारताबाहेर जेव्हा होऊ लागल्या, तेव्हा नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आला, अशी टीकाही रोहित पवारांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button