राजकारण

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर लोखंडी रॉडने हल्ला

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष चालू असून त्यातच आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्शवभूमीवर पोलिसांनी आपला तपास सुरू केला असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.

रोहिणी खडसे या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे विवाहाच्या निमित्ताने हळदीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. हळदीचा कार्यक्रम आटोपून त्या घरी परत येत होत्या. रोहिणी खडसे या आपल्या फॉर्च्युनर गाडीने येत असताना अचानक काही इसमांनी हल्ला केला. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या दगडफेकीनंतर एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर खडसे समर्थकांची घराजवळ गर्दी जमली असून वातावरण तापले आहे.

दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून तीव्र निषेध केला आहे. रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

आ. चंद्रकांत पाटील विधानसभेत मुद्दा मांडणार

मुक्ताईनगरमध्ये महिला चांगल्या प्रकारे काम करतात. रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध करतो, असं शिवसेनेचे आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी शासनदरबारी करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. हे प्रकरण विधानसभेत मांडणार असून या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

रक्षा खडसे यांच्याकडून विचारपूस

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांना मिळताच त्यांनी रोहिणी खडसे यांची घेतली भेट घटनेबाबत विचारपूस केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button