‘डेटॉल बनेगा स्वस्थ इंडिया कॅम्पेन’अंतर्गत रेकिट आणि व्हाईट हॅट ज्युनियरची भागीदारी

नवी दिल्ली : आघाडीची ग्राहकोपयोगी आरोग्य आणि स्वच्छता उत्पादन करणारी कंपनी असलेल्या व पूर्वाश्रमीच्या आरबी म्हणजेच रेकिटने आघाडीची तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षण कंपनी व्हाईट हॅट ज्युनियर बरोबर भागीदारी करून डिजिटल स्कॉलरशीप प्रोग्रामची घोषणा केली. व्हाईट हॅट ज्युनियर स्वस्थ भारत टेक चॅम्प्स प्रोग्राम असे या कार्यक्रमाचे नाव असून या उपक्रमा अंतर्गत ६-१८ वर्षे वयोगटातील मुलांना मानवी संपर्का च्या माध्यमातून वैयक्तिक स्वच्छते बरोबरच समाज आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करायचे आहेत.
आपल्या समाजातील लोकांचे लक्ष्य हे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण या गोष्टींकडे नेण्या बरोबरच त्यांना त्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी तरूण भारतीयांनी पुढाकार घ्यावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची निर्मिती ही तरूण मुलांची मने उत्साही ठेऊन त्यांत तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील स्वच्छतेशी संबंधित उपायांसाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ईॲन्डवाय कडून प्रोत्साहन देण्यात येणा-या या खुल्या स्पर्धेत ६-१८ वर्षांपर्यंतची मुले भाग घेऊ शकतात आणि ते सध्याच्या कोविड-१९ मध्ये महत्त्वपूर्ण असणार्या स्वच्छतेशी संबंधित समस्येवर इलाज शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.
“सध्याची पिढी ही तंत्रज्ञानाशी खूपच सहज समरस होणारी आहे, तंत्रज्ञान म्हणजे त्यांच्या जोडणीचे, समरस होण्याचे आणि त्यांच्या समस्या मांडण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे.” असे रेकिट साऊथ एशियाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री गौरव जैन यांनी सांगितले.“ अतिशय घातक अशा साथीच्या दिवसात आपले जीवन म्हणजे, राहणीमान, खाण्याच्या पध्दती आणि समाजात मिसळण्याच्या गोष्टींतही फरक पडला आहे. तसेच स्वच्छतेच्या बाबतीतही खूप बदल झाले आहेत. व्हाईट हॅट ज्युनियर बरोबरच्या आमच्या या करारामुळे आम्ही केवळ आरोग्य आणि स्वच्छते संबंधित समस्यांवर तत्काळ उपायच शोधत नाही तर ही गोष्ट त्यांच्यासाठी प्राधान्याची बनते. नवीन निर्माण होणारे नवीनतम उपाय हे खूपच चांगले असतील आणि यातून ते स्वच्छतेच्या सवयींचा संदेशही देतील”
“मुलं ही नैसर्गिक रित्या कलात्मक तर असतातच पण त्याच बरोबर त्यांना साहनुभूतीही असते. आणि म्हणूनच ते सध्याची संकल्पना अधिक सक्षमपणे पूर्ण करू शकतात किंवा त्या अधिक चांगल्या प्रकारे प्रत्यक्षात आणू शकतात. म्हणजेच ते ज्या संकल्पना आणतील त्या खरोखरच नाविन्यपूर्ण असतील.”असे व्हाईट हॅट ज्युनियरचे सीईओ आणि संस्थापक करण बजाज यांनी सांगितले. “ व्हाईट हॅट ज्युनियरच्या मुलांना तंत्रज्ञानाचे सक्षम वापरकर्ते बनवण्याच्या उद्दिष्ट्याचा हा उपक्रम म्हणजे सत्यात उतरवणारा एक आविष्कार आहे.”
यावेळी बोलतांना रेकिट एएमईएसए च्या एक्सटर्नल अफेअर्स आणि पार्टनरशिप्सचे संचालक श्री रवी भटनागर यांनी सांगितले “ डेटॉल बनेगा स्वस्थ इंडिया चा असा विश्वास आहे की शिक्षण हा सामाजिक बदलाचा एक मोठा भाग असून त्यामुळे मुलांना सुध्दा शक्ती प्राप्त होते. आम्ही सामाजिक दृष्ट्या सक्षम मनांना एक मंच उपलब्ध करून देतअसून या मुळे मुले या समस्यांवर इलाज शोधून या महत्त्वपूर्ण मोहिमेत सामील होऊन समाजात मोठा बदल घडवून आणू शकतील. नवीन कार्यक्रमाची सुरूवात करतांना आम्ही खूपच उत्साही आहोत आणि यातून एक अनोखा असा आरोग्याशी संबंधित उपाय सापडू शकेल.”
रेकिटकडून पहिल्या ५० निवडक विद्यार्थ्यांना ५० हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल. सहा महिन्यांची ही मोहिम खालील टप्प्यात कार्यरत असेल –
संकल्पना सादर करणे ( १२ एप्रिल – १३ मे २०२१)
२०० पहिल्या संकल्पनांना व्हाईट हॅट ज्युनियरच्या तज्ञां कडून मार्गदर्शन करण्यात येईल व संकल्पनेवर काम करून सहभागी स्पर्धकांना मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी सहकार्य केले जाईल.
पहिल्या ५० विद्यार्थ्यांची निवड
गेल्या सहा वर्षांपासून डेटॉल बनेगा स्वस्थ इंडिया ने सहभागी झालेल्या १३ दशलक्ष मुलांच्या जीवनात अधिक स्वच्छ आरोग्य आणि स्वच्छते शी संबंधित मोठी भुमिका अदा केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणजे भारतीय लोकांकडून सुरक्षित उद्यासाठी उचललेली पाऊले होत. या साथीच्या फैलावा मुळे स्वच्छता आणि निर्जंतुकपणा या गोष्टी प्राधान्याने समोर येत असून हा उपक्रम म्हणजे आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि सुयोग्य पोषण यांच्या बरोबर पर्यावरण संवर्धनाच्या गोष्टी शाश्वत विकासातून साध्य केल्या जात आहेत.




