राजकारण

रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट : जितेंद्र आव्हाड

भाजपसोबत राहण्यासाठी राजेंद्र पाटील-यड्रावकरांवर दबाव

मुंबई : परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर अखेरीस महाविकास आघडी आक्रमक झाली आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यात खळबळजनक माहिती समोर येण्याचं सत्र सुरु आहे. काल कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आज पुन्हा ट्वीट करत शुक्लांवर आरोप केले आहेत. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा माध्यामांशी संवाद साधताना याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आव्हाड म्हणाले की, मी स्वतः राजेंद्र पाटील-यड्रावकरांशी बोललो. त्यांनी मला सगळी परिस्थिती सांगितली. त्यांच्या मागे पोलीस ऑफीसर लावण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांनी ‘मेरे साथ चाय पिओगे, तो नमक हरामी नही होगी’ असं त्यांना म्हटलं होतं. रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले की, या सरकारला दिलदार राहणं महागात पडलं. रश्मी शुक्ला यांनी रडून माझ्या पतीचं आताच निधन झालय असं म्हणून माफी मागितली होती. मग आमच्या सरकारला पाझर फुटला. रश्मी शुक्ला यांनी पाया पडत माफी मागितली आणि त्यांनी दिलेलं लेखी पत्र परत मागितलं. बरं झालं सरकारने ते पत्र परत नाही दिलं. आता कळतंय हा कटाचा भाग होता. रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या. तसेच विरोधकांकडून सातत्यानं केल्या जाणाऱ्या मागणीसंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आम्ही शपथ घेतल्यानंतर 36व्या तासांनंतर राष्ट्रपती राजवट लागू होणार असं बोललं जाऊ लागलं. त्यात काही नवं नाही.

म्हाडाचे 100 फ्लॅट्स कॅन्सरग्रस्तांना राहण्यासाठी देणार
म्हाडाचे 100 फ्लॅट्स कॅन्सरग्रस्तांच्या सोयीसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे सोपवले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज(गुरूवार) पत्रकापरिषदेत बोलताना दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईतील टाटा हॉस्पिटलचे अधिकारी देखील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button