स्पोर्ट्स

जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत चौथ्या दिवसाच्या खेळावरही पाणी

भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त जेतेपद मिळणार !

साऊदॅम्प्टन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचा चौथा दिवस पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता दोन दिवसांत या सामन्याचा निकाल न लागल्यास भारत व न्यूझीलंड या दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाणार आहे. साऊदॅम्प्टन येथील हवामानाच्या लहरीपणाचा फटका पहिल्या दिवसाला बसला त्यानंतर दुसरा व तिसरा दिवस पावसाच्या लपाछपीत खेळवण्यात आला. पाचव्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता कमी असली तरी उर्वरित दोन दिवसांत निकाल लागणे अवघड आहे.

तिसऱ्या दिवशी ३ बाद १४६ धावांवरून सुरूवात करणाऱ्य़ा टीम इंडियाचा डाव किवी गोलंदाजांनी २१७ धावांवर गुंडाळला. त्यानंतर टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी ७० धावांची सलामी देताना टीम इंडियाला हैराण केले. अश्विननं भारताला पहिली विकेट मिळवून दिली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २५ वेळा पहिली विकेट घेण्याच्या अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी अश्विननं बरोबरी केली. इशांत शर्मानं किवीला दुसरा झटका दिला. खेळपट्टीवर सेट झालेल्या कॉनवेला त्यानं बाद केलं, मोहम्मद शमीनं सुरेख झेल टिपला. कॉनवेनं १५३ चेंडूंत ६ चौकारांसह ५४ धावांची खेळी केली. रॉस टेलर व केन विलियम्सन ही अनुभवी जोडी मैदानावर असताना अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. किवींच्या २ बाद १०१ धावा झाल्या असून ते ११६ धावांनी पिछाडीवर आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button