आरोग्यस्पोर्ट्स

क्रीडाविश्वातील दिग्गजांच्या साथीने मानसिक तंदुरुस्तीचा फ्युचर जनेराली इंडिया इन्शुरन्सतर्फे प्रचार

मुंबई : मानसिक आरोग्य या विषयाला मुख्य प्रवाहात सामील करण्याच्या वचनबद्धतेसमवेत फ्युचर जनेराली इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड (एफजीआयआय)ने युट्यूब आणि फेसबुकवर ‘माइंड मॅटर्स’ हा टॉक शो लॉन्च केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कंपनीने क्रीडाविश्वातील अग्रगण्य व्यक्तींसाठी मंच तयार केला असून या माध्यमातून हे महान खेळाडू स्वत:च्या जीवनातील मानसिक समस्यांच्या कथा मांडणार आहेत. या दिग्गज खेळाडूंना व्यक्तिगत समस्यांचा सामना त्यांच्या क्रीडा कारकिर्दीत करावा लागला.

दूरचित्रवाणी सादरकर्ते आणि अभिनेते समीर कोच्चर हे दिग्गज क्रीडापटूंना संभाषण मालिकेतून बोलते करणार आहेत. या दरम्यान ते सानिया मिर्झा, अभिनव बिंद्रा, सुनील छेत्री, रॉबिन उथप्पा आणि चेतेश्वर पुजारा यांच्याशी संवाद साधतील. या संभाषणाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे या खेळाडूंनी मानसिक आरोग्याच्या समस्यांशी कशाप्रकारे लढा दिला. या प्रवासात स्व-जागरुकता कशी कामी आली हे सांगताना ही समस्या कोणालाही जडू शकते आणि त्याकडे डोळेझाक करणे योग्य ठरणार नाही या मुद्यावर हे खेळाडू जोर देताना दिसतील. मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, जुनाट समजुतींचे उच्चाटन आणि मानसिक स्वास्थ्यासंबंधी आरोग्यदायी चर्चांमध्ये लोकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा हे या चर्चासत्राचे महत्त्वाचे उद्दिष्ट असेल.

फ्युचर जनेराली इंडिया इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ अनुप राऊ म्हणाले की, “समस्त भारतीयांनी स्वत:चे मानसिक स्वास्थ्य गंभीरपणे घ्यावे, यादृष्टीने अभियान उभे करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. महासाथीने अस्थिरता आणि तणावाचे प्रमाण वाढवले आहे, लोक तज्ज्ञांकडे जात आहेत आणि सल्ल्यासाठी लोकांचे वाढते प्रमाण पाहून मी दु:खी झालो. आम्ही मालिका तयार करण्याचे ठरवले, क्रीडाविश्वातील दिग्गज खेळाडूंना पाचारण केले आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पाहिलेले चढ-उतार लोकांना सांगावे याकरिता उद्युक्त केले. आमचा टॉक शो – ‘माइंड मॅटर्स’ हा क्रीडाविश्वातील खेळाडूंच्या लोकांनी न पाहिलेल्या बाजूवर प्रकाश टाकेल- मानसिक आरोग्य राखण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष यानिमित्ताने अधोरेखित होणार आहे. या खेळाडूंनी त्यावर कसा अंकुश मिळवला ते देखील समोर येईल. या क्रीडापटूंचा दिलखुलास संवाद पाहून अनेक जण मोकळेपणाने बोलतील. स्वत:च्या आयुष्यातील आव्हानांची चर्चा करतील आणि वेळीच उपचार घेतील.”

साप्ताहिक मालिकेचा पहिला भाग – ‘माइंड मॅटर्स’, ज्यामध्ये सुनील छेत्रीचा सहभाग.

प्रेक्षकांना हा टॉक शो खालील लिंकवर पहाता येईल –

YouTube – https://www.youtube.com/watch?v=d72NrBeDa48

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button