आरोग्य

पुणे विभागीय आयुक्तांना २ महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

पुणे : राज्यात कोरोनाचा कहर अद्याप सुरू असून मुंबई, नाशिक आणि पुणे या सारख्या मोठ्या शहरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी राव यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. सौरभ राव यांचं लसीकरण पूर्ण झाले असतानाही त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मिळतेय.

वर्षभऱ कोरोना रुग्णांची सेवा केल्यानंतर १६ मार्च रोजी सौरभ राव यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर राव यांना हा कोरोनाचा संसर्ग झाला होता. पहिल्यांदा कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर राव यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. सौरभ राव यांनी कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांनी पुन्हा कोरोना टेस्ट केली. या टेस्टचा रिपोर्ट सोमवार पॉझिटिव्ह आला. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होताना दिसतेय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button