
नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेनमधील युद्ध अधिकाधिक भीषण बनत आहे. मागील चार दिवसात रशियाने यूक्रेनच्या जवळपास सर्व प्रमुख शहरांवर हल्ला चढवलाय. त्यातच आता रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब हल्ल्याची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी रशियन न्यूक्लियर डिटरन्स फोर्सला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून नवी दिल्लीकडे धाव घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एक उच्चस्तरिय बैठक पार पडली. या बैठकीत यूक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिक यांची सुरक्षा आणि त्यांना भारतात परत आणण्यावर चर्चा झाली. तशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलीय.
#WATCH | PM Narendra Modi chairs a high-level meeting on the Ukraine issue. pic.twitter.com/eJELxgnqmO
— ANI (@ANI) February 27, 2022
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उच्चस्तरीय बैठक २ तासांपेक्षा अधिक काळ चालली. यावेळी पंतप्रधान मोदींनी यूक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना भारतात परत आणण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले. भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी यूक्रेनच्या शेजारील देशांसोबत चर्चा सुरु आहे’.
युक्रेनच्या बॉर्डरवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण
This is the behavior with Indian students at Poland border. They are kicked and told to go back as India didn’t supported Ukraine . Now this is devastating @PMOIndia @DrSJaishankar @narendramodi @MEAIndia @ANI @BBC @aajtak pic.twitter.com/gMeSB0BFfK
— Shivangi shibu (@IndShivangi) February 27, 2022
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मारहाण होत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांकडून हे व्हिडिओ ट्विट करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीयांची चिंता आणखी वाढली आहे. फक्त स्थानिक नागरिकांना प्रवेश देत पोलंड बॉर्डरवर भारतीयांना बाजुला काढण्यात येत आहे. एवढेच नाही तर त्यांना लाथा, बुक्क्यांनी मारहाणही करण्यात येत आहे. जे भारतीय स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर सैन्य आणि स्थानिक पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याच्याही घटना समोर आल्या आहे. ही मारहाण विद्यार्थ्यांच्या घरच्यांनाही अस्वस्थ करणारी आहे. प्रशासनाने तातडीने यावर मार्ग काढत विद्यार्थ्यांची सुटका करावी, अशा याचना करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.
रशियानं युक्रेनच्या ४७१ सैनिकांना ताब्यात घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या एकूण ९७५ सैन्य तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियानं केला आहे. तसंच रशियाकडून अधिक आक्रमक भूमिका घेतली गेली असून युक्रेनची राजधानी कीव वर रशियानं ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे युक्रेननं रशियाच्या आतापर्यंत ४,३०० सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे. तसंच १४६ रणगाडे, २७ विमानं आणि २६ हेलिकॉप्टर पाडल्याचंही युक्रेननं म्हटलं आहे.
युक्रेनच्या खार्किव शहरावर रशियानं कब्जा केला असून आता राजधानी कीवलाही चारही बाजूंनी वेढलं गेलं आहे. रशियन सैन्यानं खार्किववर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनं दिली आहे. खार्किव हे युक्रेनमधील दुसरं सर्वात मोठं शहर मानलं जातं. हे शहर रशियन सीमेपासून २० किमी अंतरावर आहे. रविवारी रशियन सैन्यानं खार्किवमधील विमानतळ, इंधन साठा आणि इतर महत्वाच्या संस्थांवर हल्ले करत शहरावर ताबा मिळवला आहे.
युक्रेनेच्या खासदारही युद्धात उतरल्या
रशियन सैन्याला शहरांमध्ये युक्रेनियन सैन्याकडून जोरदार प्रतिकार करावा लागत आहे. क्वीव आणि इतर शहरांचे रक्षण करण्यासाठी युक्रेनच्या सामान्य लोकही रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या बंदुका घेतल्या आणि रशियन सैन्याशी लढण्यासाठी पुढाकार घेतला. युक्रेनचे अधिकारी आंद्रे सिन्युक यांनी रविवारी होरोमाडस्के टीव्ही चॅनेलला सांगितले की सरकार देशासाठी लढू इच्छिणाऱ्या लष्करी अनुभव असलेल्या कैद्यांना सोडत आहे. मात्र यात कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यातील कैद्यांना सोडणार हे अजूनही स्पष्ट करण्यात आले नाही. युक्रेनच्या राष्ट्रपतींपासून ते युक्रेनच्या महिला खासदारांपर्यंत सर्वजण सध्या हातात बंदुका घेऊन रशियाशी झुंज देत आहेत.
स्वातंत्र्य टीकवण्यासाठी कडवी झुंज
क्वीवच्या महापौरांच्या सांगण्यानुसार, वासिलिकिवमधील विमानतळाजवळील तेल डेपोमध्ये स्फोट झाल्याचे आकाशात दिसून. या भागात युक्रेनच्या सैनिकांची रशियन सैन्याशी जोरदार लढाई झाली. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने सांगितले की जुलियानी विमानतळावर आणखी एक स्फोट झाला. झेलेन्स्कीच्या कार्यालयाने असेही म्हटले आहे की रशियन सैन्याने खार्किवमध्ये गॅस पाइपलाइन उडवली, ज्यामुळे सरकारने लोकांना त्यांच्या निवासस्थानाच्या खिडक्या ओल्या कापडाने झाकून धुरापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला. झेलेन्स्की म्हणाले की आम्ही आमच्या देशासाठी लढत आहोत, आमचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी लढत आहोत. मात्र कालची रात्र कठीण होती. जोरदार गोळीबार झाला, अनेक भागांवरही बॉम्बफेक करण्यात आली आणि पायाभूत सुविधांना टार्गेट करण्यात आले.