पंतप्रधान मोदींच्या केदारनाथ दौऱ्याला पुजार्यांचा विरोध
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ नोव्हेंबरला केदारनाथ दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र त्यांच्या दौऱ्याला विरोध सुरू झाला आहे. तेथील पुजार्यांकडून (पुरोहीत) पंतप्रधान मोदींच्या भेटीचा विरोध होतोय. परिस्थिती सावरण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी केदारनाथला जाऊन तेथील पुजार्यांशी चर्चा केली. त्यांनी बंद खोलीत जवळपास सात तास पुजार्यांशी बोलून त्यांच्या विरोधावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
दोन दिवसांपूर्वीही माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि कॅबिनेट मंत्री धनसिंह रावत केदारनाथला गेले होते, त्यावेळीही पुजार्यांकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. पुजाऱ्यांनी त्रिवेंद्र सिंह आणि धनसिंह यांना दर्शनही घेऊन दिल नाही. यानंतर पुजाऱ्यांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला. पुजारी आणि पंडा समाजाचा विरोध पाहता आज मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केदारनाथला जाऊन पुजारी समाजाशी चर्चा केली. त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याचा आढावाही घेतला. उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणिक आहे. निवडणिकुच्या पार्श्वभूमीवर हा विरोध भाजपसाठी चिंतेची बाब आहे.
जानेवारी २०२० मध्ये त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या सरकारने चार धाम देवस्थान बोर्डाची स्थापना केली. त्यामुळे चार धामसह अन्य ५१ मंदिरांचे नियंत्रण राज्य सरकारकडे आले. उत्तराखंडमधील चार धाम आहेत- केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथ. त्यानंतर पुजारी आणि पंडा समाजाने या निर्णयाचा विरोध केला आणि निर्णय मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर आताचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ३० ओक्टोबर २०२१ पर्यंत समिती स्थापन करुन, एक रिपोर्ट सादर करुन बोर्डाची स्थापनेचा निर्णय मागे घेईल असं सांगितलं होतं. मात्र, आजुनपर्यंत काहीही निर्णय झाला नाही म्हणून पुजारी आणि पंडा समाजाने उत्तराखंड सरकारचा विरोध सुरू केला. आणि आता पंतप्रधान मोदींच्या भेटीचा विरोध होतेय.
मोदींची यंदाची दिवाळी थेट काश्मीर खोऱ्यात, जवानांचा उत्साह वाढवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या तीन वर्षांपासून आपली दिवाळी सैन्यातील जवानांसमवेत साजरी करत असतात. यंदाही जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवर जाऊन ते दिवाळी साजरी करणार आहेत. मोदी हे जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील नौशहरा भागातील जवानांसमवेत दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे सेलिब्रेशन करणार आहेत. काश्मीर खोऱ्यातील अत्यंत संवदेनशील भाग असलेल्या नौशहरा कॅम्पमध्ये मोदी येणार आहेत. त्यामुळे, या परिसरातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजौरी सेक्टरमध्ये येणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, सीमारेषेवरील जवानांमध्येही पंतप्रधान मोदींच्या येण्याने दिवाळीचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. सध्या जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर शांतता ठेवण्यासाठी सैन्य दलाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. मात्र, त्यातही दहशतवादी कारवाया होत असून सैन्य दलाकडून दहशतवाद्यांच्या नापाक हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.