राजकारण

प्रदीप शर्मानेच जिलेटीन आणले; सचिन वाझेची ‘एनआयए’समोर कबुली

प्रदीप शर्मांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

मुंबई : सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्ब पाठोपाठच आता प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्कॉर्पिओत सापडलेल्या स्फोटकांचा मोठा खुलासा गुरूवारी नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) समोर झाला आहे. खुद्द सचिन वाझे यानेच जिलेटीनबद्दलची माहिती दिली आहे. स्कॉर्पिओत सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या या माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनीच आणल्याला जबाब सचिन वाझे यांनी एनआयएकडे नोंदवला आहे.

प्रदीप शर्मा यांनीही जिलेटीनच्या कांड्या कुठून कधी आणल्या याचाही खुलासा त्यांनी आपल्या जबाबात केला आहे. तसेच मनसुख हिरेन यांचे जिलेटीनच्या कांड्याशी असलेले कनेक्शनही सचिन वाझे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सीमकार्डच्या वापराबाबतची मोठा खुलासा एपीआय सचिन वाझेकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच एनआयएपुढे येत्या दिवसांमध्ये सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांची एकमेकांसमोर चौकशी होईल अशी माहिती एनआयएमधील सूत्रांनी दिली आहे.

जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ एंटेलियासमोर ठेवतानाही प्रदीप शर्मा यांचा सहभाग होता, असा खुलासा सचिन वाझे यांनी केला आहे. जिलेटीनच्या कांड्या आणण्यासाठी प्रदीप शर्मा गुजरातला गेले होता. ३ ते ४ मार्च दरम्यान त्यांनी गुजरातहून सीमकार्डही आणले. अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ पार्क करताना मनसुख हिरेन आणि प्रदीप शर्मा हे दोघेही सोबत असल्याचा दावा सचिन वाझे यांनी केला आहे.

आता या संपूर्ण प्रकरणात प्रदीप शर्मा यांना एनआयएमार्फत पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले. त्यामुळेच सलग दुसऱ्या दिवशी प्रदीप शर्मा चौकशीसाठी पोहचले आहेत. या संपूर्ण कटामध्ये प्रदीप शर्मा माझ्यासोबत होते, असा खुलासा सचिन वाझे यांनी केला आहे. त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणात चौकशीसाठी सचिन वाझे यांच्या समोरच बसवून प्रदीप शर्मा यांचीही चौकशी एनआयए करणार असल्याचे बोलले जात आहे.

—-

जे बी नगर लोकेशनवरुन दुवा जुळला

एनआयएच्या अटकेतील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि काँस्टेबल विनायक शिंदे यांचे वरळी सी लिंकवरील सीसीटीव्ही फूटेज समोर आलं होतं. त्याच दिवशी (2 मार्च) वाझे आणि शिंदे यांनी अंधेरीच्या जे बी नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची भेट घेतली होती. प्रदीप शर्माही जे बी नगरमध्येच राहतात. मनसुख हिरेन यांना ज्या नंबरवरुन ‘तावडे’ नावाने कॉल करुन घोडबंदर रोडला बोलवण्यात आले होते. त्या सिमचे शेवटचे लोकेशनही जे बी नगर होते. सूत्रांकडून जी माहिती मिळते, त्यानुसार वाझे यांना अटक केल्यानंतर प्रदीप शर्मा हे एटीएस कार्यालयातही गेले होते जिथे जाऊन त्यांनी एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची भेट घेतली होती. अशा परिस्थितीत प्रदीप शर्मा यांच्यावर संशयाची सुई आहे. म्हणूनच एनआयए प्रकरण सुरु होण्याच्या दिवसापासून गुन्ह्याच्या दिवसापर्यंत प्रदीप शर्मांच्या हालचालींची चौकशी करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button