Top Newsराजकारण

सुरक्षेतील हलगर्जीपणावर पंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींशी चर्चा

सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात, पंजाब सरकारकडूनही चौकशी समितीचे गठन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील सुरक्षेच्या हलगर्जीपणानंतर देशाचे राष्ट्रपती रामानाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यावर असलेल्या सुरक्षा त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याशीही मोदींनी चर्चा केली आहे. त्यांनीही मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. मोदींच्या सुरक्षेत पंजाबमध्ये हलगर्जीपणा झाला असल्याचे समोर आले आहे. सुरक्षेच्या कारणावरुन देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली असून सुरक्षेच्या मुद्द्यावरच चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले की, सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत, जेणेकरून भविष्यात अशा त्रुटी पुन्हा होणार नाहीत.

राष्ट्रपती कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत. “राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल पंजाबमधील त्यांच्या ताफ्यातील सुरक्षेतील त्रुटींबद्दल विचारपूस केली. या गंभीर त्रुटीबद्दल राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. असे मजकूरही लिहिला आहे.

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा फिरोजपुर येथील उड्डाणपुलावरुन जाणार होता. याच मार्गावर शेतकरी आंदोलन करण्यासाठी एकत्र जमले होते. परंतु मोदींच्या ताफ्यासाठी मार्ग पोलिसांकडून रिकामा करण्यात आला नाही. यामुळे असा प्रश्न उपस्थित होत आहे की, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती ते का झाले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यात मुख्य सचिव आणि डीजीपींसाठी गाडी राखीव ठेवण्यात आली होती. परंतु मुख्य सचिव आणि डीजीपीसारखे मोठे अधिकारी सहभागी नव्हते. जर एखाद्या राज्यात पंतप्रधान मोदी दौऱ्यासाठी जाणार असतील तर मोदींच्या स्वागतासाठी त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव उपस्थित राहतात. परंतु पंजाबमध्ये असे काही घडले नाही.

प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात, पंजाब सरकारकडूनही चौकशी समिती गठीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेय. या प्रकरणावरून आता अनेक नेत्यांनी पंजाब सरकारला धारेवर धरलंय. विशेष म्हणजे मोदींनीही विमानतळावर जिवंत पोहोचलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा म्हणत टोलाही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना लगावलाय. आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेय. दुसरीकडे पंजाबच्या चन्नी सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीची बाब सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्यासमोर मांडण्यात आलीय. सरन्यायाधीशांचे खंडपीठ शुक्रवारी यावर सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं जातंय.

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी या प्रकरणाशी संबंधित जनहित याचिका दाखल केली. अशा सुरक्षेतील त्रुटी मान्य करता येणार नाही, असे याचिकेत म्हटलेय. या याचिकेत वरिष्ठ अधिवक्ता मनिंदर सिंग यांनी पंजाब सरकारला योग्य निर्देश देण्याची, जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय. भविष्यात अशी चूक होणार नाही, यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणामुळे पंजाब सरकार आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. पंजाब सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केलीय. तत्पूर्वी पंजाबमध्ये मोदींचा ताफा रोखल्यानंतर बुधवारी पंजाब सरकारला विरोधकांनी घेराव घातला होता. अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव (गृह व्यवहार आणि न्याय) अनुराग वर्मा यांचा समावेश आहे. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button