Top Newsराजकारण

सिद्धूंनी कायमचे मौन पाळले तर काँग्रेसला आणि देशाला शांतता; भाजपची टीका

नवी दिल्ली : एकीकडे पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अन्य पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असली, तरी दुसरीकडे काँग्रेस मात्र अंतर्गत वाद मिटवण्यासाठी धडपडताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे न घेण्याबाबत नवज्योत सिंग सिद्धू ठाम आहेत. याच दरम्यान लखीमपूर हिंसाचारातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नवज्योतसिंग सिद्धू यांनी मौन व्रत पाळलं होतं. यावरून हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी त्यांना सणसणीत टोला लगावला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी जर कायमचं मौन पाळलं तर काँग्रेस आणि देशाला खूप शांतता मिळेल, असं म्हटलं आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी मौन व्रत पाळलं आहे. जर त्यांनी हे मौन व्रत कायमचं पाळलं तर काँग्रेसलाही खूप शांतता मिळेल आणि देशालाही, असं म्हणत अनिल विज यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच काँग्रेस हे एक जहाज आहे जे बुडणार आहे, अशी बोचरी टीका देखील केली आहे. काँग्रेसमध्ये कलह आहेत. जेव्हा एखादं जहाज बुडायला लागतं तेव्हा ते डगमगू लागतं. त्याचप्रमाणे, काँग्रेस देखील पुन्हा पुन्हा डगमगत आहे. याचवरून स्पष्ट होत आहे की, काँग्रेसचं जहाज बुडणार आहे, असं अनिल विज यांनी म्हटलं आहे.

हरियाणातील शेतकऱ्यांचं कौतुक करताना अनिल विज यांनी राज्यातील शेतकरी खूप हुशार आहेत. हरियाणाच्या शेतकऱ्यांना व्यवस्थित ठाऊक आहे की पिकांचे अवशेष जाळल्याने पर्यावरणाचं नुकसान होतं आणि जमिनीची सुपीकता देखील कमी होते. त्यामुळे हरियाणातील शेतकरी या बाबतीत नेहमी सावध असतात आणि शेतकऱ्यांना सरकारकडून वेळोवेळी याबाबत माहितीही दिली जाते, असं देखील म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button