इतर

परमबीर सिंगांची सुप्रीम कोर्टात धाव; गृहमंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशीची मागणी

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh letter) यांनी सुप्रीम कोर्टात याचिका (Supreme Court) दाखल केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra home Minister Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचारांची निष्पक्ष चौकशी करावी, पुरावे नष्ट होण्यापूर्वी तातडीने दखल घ्यावी, अशी विनंती परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केली आहे. महत्त्वाचं म्हणजे परमबीर सिंगांनी पुरावे नष्ट होण्याची भीती व्यक्त करताना, मागील काही दाखले दिले आहेत. या याचिकेत त्यांनी तत्कालिन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा संदर्भ दिला आहे.

रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती गेल्या वर्षी तत्कालिन पोलीस महासंचालकांना दिली होती, असा दावा परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे. रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाचीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ज्या अहवालात, बदली आणि पोस्टिंगबद्दल गैरप्रकार झाल्याचा उल्लेख आहे.

परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय, “गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक आहे. अनिल देशमुखांनी फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या निवासस्थानी ACP सचिन वाझे आणि ACP संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेत अनिल देशमुखांनी दिलं होतं. त्यापूर्वी 24 की 25 ऑगस्ट 2020 मध्ये , रश्मी शुक्ला, ज्या राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त होत्या, त्यांनीही पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी याप्रकरणात अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आलं होतं. मग गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करुन पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते, असा उल्लेख परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button